Home > Politics > मोदी मंत्रीमंडळातून नारळ मिळालेले बाबुल सुप्रियो तृणमूल कॉंग्रेस च्या वाटेने

मोदी मंत्रीमंडळातून नारळ मिळालेले बाबुल सुप्रियो तृणमूल कॉंग्रेस च्या वाटेने

मोदी मंत्रीमंडळातून नारळ मिळालेले बाबुल सुप्रियो तृणमूल कॉंग्रेस च्या वाटेने
X

मोदी मंत्रीमंडळातून नारळ मिळालेले अनेक मंत्री सध्या नाराज आहेत. त्यापैकी एक म्हणजे बाबुल सुप्रियो... पश्चिम बंगाल आसनसोल मधील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्याबाबत आता राजकीय वर्गाचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर ते राजकारणातून निवृत्त होतील अशी चर्चा सुरु असताना ते तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान बाबुल सुप्रियो यांनी ट्विटरवर मुकुल रॉय आणि टीएमसीला फॉलो केल्याचं सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळं आता चर्चेला उधाण आलं आहे.

मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. गायक असलेले सुप्रियो बाबुल यांनी लिहिले, ज्या पद्धतीने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले गेले ते योग्य नाही.

ते म्हणतात, मला राजीनामा द्यायला सांगितला मी दिला. विशेष बाब म्हणजे सुप्रियो यांनी राजीनामा दिल्यानंतर बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनीही संताप व्यक्त केला होता. मात्र, बाबुल सुप्रियो आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध कधी चांगले नव्हते. लोकसभा निवडणूका असोत किंवा विधानसभा निवडणूका बंगालमध्ये त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर बर्‍याचदा हल्ले झाले आहेत.

दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाबुल सुप्रियो यांना टॉलीगंगे विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

विशेष म्हणजे बंगालच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक नेत्यांनी पक्ष सुद्धा सोडला आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावरही अनेक नेत्यांनी टीका केली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री न बनविल्याने सुद्धा पक्षातील अनेक नेते संतप्त आहेत.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष घोष यांनी म्हंटलं आहे की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होते. "मी त्यांना वेगवेगळ्या विधानांबद्दल माहिती दिली, जे कोणताही विचार न करता जाहीरपणे दिले गेले होते. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य कमी होते. त्यामुळे हे थांबवलं पाहिजे. थोडक्यात पक्षात जी विधानं व्हायला हवी होती ती जाहीरपणे दिली गेली.'' असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे.

Updated : 14 July 2021 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top