Home > Politics > 'तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो' ; शेलार- सावंत यांच्यात मालवणीमध्ये कलगीतुरा

'तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो' ; शेलार- सावंत यांच्यात मालवणीमध्ये कलगीतुरा

तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो ; शेलार- सावंत यांच्यात मालवणीमध्ये कलगीतुरा
X

मुंबई : सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवल्यानंतर ट्वीटरवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला आहे, विशेष म्हणजे हा सामना मालवणीमध्ये रंगला आहे. राणे यांच्या पॅनेलने आपलं वर्चस्व कायम राखत महाविकास आघाडीला दे धक्का दिला. राणे पॅनलनं 19 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवला.

या निवडणुकीनंतर सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. त्यानंतर ट्वीटरवर आशीष शेलार विरुद्ध सचिन सावंत वॉर पाहायला मिळत आहे. आशीष शेलार यांनी सावंत यांना टोमणा मारला आहे.

'देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्...आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो. 'नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!' असं शेलार यांनी म्हटले आहे.

तर , 'शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो' असं मालवाणीत जोरदार प्रत्युत्तर सावंत यांनी शेलार यांना दिला आहे.

येत्या काळात याच मुद्द्यावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना आणखी रंगण्याची शक्यता आहे.

Updated : 31 Dec 2021 12:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top