Home > Politics > '...तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही' ; आशिष शेलार यांचा नवाब मलिकांवर निशाणा

'...तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही' ; आशिष शेलार यांचा नवाब मलिकांवर निशाणा

...तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही ; आशिष शेलार यांचा नवाब मलिकांवर निशाणा
X

मुंबई : अमरावतीमधील हिंसाचारानंतर आता राज्यात राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शेलार यांचा एक फोटो दाखवत मलिक यांनी, शेलारांनी रझा अकादमीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. हा षडयंत्राचाच भाग होता का? असा सवाल केला. दरम्यान नवाब मलिक यांच्या या आरोपाला आशिष शेलार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'नवाब मलिक यांना मराठीतील 'ती' म्हण पुर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे' असं म्हणत शेलार यांनी मलिकांवर जोरदार निशाणा साधला. दरवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या आधारे अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.असं शेलार यांनी म्हटले आहे. माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. रझा अकादमी सोबतचे तुमचे फोटो आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही', असा इशाराच शेलार यांनी मलिकांना दिला.

Updated : 15 Nov 2021 1:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top