Home > Politics > "पोलिसांना न घेता आंदोलनाला या मग..."आशिष शेलार यांचे शिवसेनेला आव्हान

"पोलिसांना न घेता आंदोलनाला या मग..."आशिष शेलार यांचे शिवसेनेला आव्हान

पोलिसांना न घेता आंदोलनाला या मग...आशिष शेलार यांचे शिवसेनेला आव्हान
X

शिवसैनिकांनी पोलिसांना सोबत न घेता आंदोलनाला यावे, मग आम्ही दाखवतो...या शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे. नारायण राणे यांनी कानशिलात लगावण्याची भाषा वापरल्याने त्यांना अटक करण्यात आली. पण कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीला माफ करणाऱ्या शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी काही तरी शिकावे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. आशिष शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याप्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. परिवहन मंत्री अनिल परब यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते नारायण राणे यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना आदेश देत असल्याचे दिसते आहे. हाच व्हिडिओ दाखवत आशीष शेलार यांनी नारायण राणेंना राजकीय सूडबद्धीने अटक करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

"जिल्हा नियोजन आढावा बैठकीमध्ये असलेल्या अनिल परब यांनी पोलिसांना नारायण राणे यांचा जामीनअर्ज सत्र न्यायालय आणि हायकोर्टाने फेटाळल्याचे सांगितले. तसेच त्यांना पोलीसी बळाचा वापर करुन ताब्यात घेण्याचे आदेश त्यांनी दिले. ही बैठक ११ ते १ होती, पण या कालावधीत सत्र न्यायालय आणि हायकोर्टात राणेंतर्फे कोणतीही याचिकाच दाखल कऱण्यात आली नव्हती, तर मग अनिल परब यांनी पोलिसांना खोटे का सांगितले" असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे

ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली ते पाहता कायद्याचे राज्य आणि राज्यकारभार आहे का, असा प्रश्न आशीष शेलार यांनी विचारला. त्यामुळे नारायण राणे यांच्या अटक प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

Updated : 25 Aug 2021 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top