Home > Politics > EDच्या समन्सला अनिल देशमुख यांचे उत्तर

EDच्या समन्सला अनिल देशमुख यांचे उत्तर

EDच्या समन्सला अनिल देशमुख यांचे उत्तर
X

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावली होती. पण सुप्रीम कोर्टाने देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे. EDने आपल्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची याचिका अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. देशमुख यांनी दाखल केलेली ही याचिका स्वीकृत झालेली आहे आणि या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर ईडीसमोर हजर होऊ, असे उत्तर अनिल देशमुख आणि त्यांचे चिरंजीव ऋषीकेश यांचे वकील एडव्होकेट इंद्रपाल सिंग यांनी ईडीला सांगितले आहे. इंद्रपाल सिंग यांनी ईडीने बजावलेल्या समन्सला उत्तर दिले आहे.

PMLA कायद्यातील तरतुदींमुळे कोर्टाने अनिल देशमुख यांच्यासह विविध प्रकरणांतील जवळपास ४० याचिकाकर्त्यांच्या दिलासा याचिका फेटाळल्या होत्या. पण त्याचवेळी CRPC अंतर्गत कायदेशीर हक्क बजावण्याचा मार्ग खुला असल्याचेही सुप्रीम कोर्टामे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्याप्रमाणे अनिल देशमुख, ऋषीकेश देशमुख यांना CRPC अंतर्गत कायदेशीर हक्क बजावण्याचा मार्ग खुला आहे. त्यामुळे आधी सुप्रीम कोर्टात आमच्या खटल्याची सुनावणी होऊ द्या, मग आम्ही ईडीसमोर हजर राहू आणि पूर्ण सहकार्य करू असं ईडी प्रशासनाला सांगून त्यांच्याकडून वेळ मागून घेतल्याचं ॲड. सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Updated : 18 Aug 2021 8:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top