Home > Politics > Andheri East : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ठरणार ऐतिहासिक?

Andheri East : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ठरणार ऐतिहासिक?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणूकीत भाजपने माघार घेतली आहे. मात्र तरीही ही निवडणूक ऐतिहासिक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Andheri East : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ठरणार ऐतिहासिक?
X

Andheri East bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East bypoll Election)पोटनिवडणूकीत भाजपने माघार घेतली असली तरी अपक्षांचे अर्ज कायम आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके विरुध्द अपक्ष (rutuja latke vs independent) असाच सामना होणार आहे. मात्र भाजपने उमेदवार मागे घेऊन मोठी चाल खेळल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने भाजप (BJP) पैसे वाटून नोटांचा प्रचार करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपने माघार घेतल्यानंतरही या निवडणूकीतील ट्वीस्ट कमी झाला नाही. मात्र शिवसेनेच्या तक्रारीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी नोटांचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मतदाना आधीच वातावरण तापले होते.

ऋतुजा लटके यांचे पारडे जड

शिवसेना आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यापार्श्वभुमीवर ऋतुजा लटके यांनी सभा आणि पायी फिरुन मतदारसंघ पिंजून काढला. त्याबरोबरच आदित्य ठाकरे यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत जोरदार ताकद लावली आहे. त्याबरोबरच मुख्य स्पर्धक असलेल्या भाजपच्या मुरजी पटेल (Murji patel) यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.

का ठरणार ऐतिहासिक निवडणूक?

अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपने माघार घेतली आहे. मात्र ऋतुजा लटके यांच्याविरोधात नोटांचा (NOTA) प्रचार भाजपने केल्याची चर्चा आहे. या भागात भाजपचा हजारांहून अधिक मतदार आहे. त्यामुळे हजार मतदान नोटाला झाले तर ही निवडणूक देशातील ऐतिहासिक निवडणूक होऊ शकते. यापुर्वी नोटाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले नव्हते. मात्र या निवडणूकीत नोटाला मतदान झाल्यास ही निवडणूक ऐतिहासिक ठरू शकते.

मुख्य पक्ष भाजपने माघार घेतल्याने ऋतुजा लटके यांचा अपक्षांशी सामना होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत मुख्य स्पर्धक नसल्याने ऋतुजा लटके यांना सर्वाधिक मतं मिळू शकतात. त्यामुळे सर्वाधिक मतं मिळाल्यासही ही निवडणूक ऐतिहासिक ठरू शकते.

Updated : 3 Nov 2022 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top