Home > Politics > Andheri East bypoll : अखेर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध?

Andheri East bypoll : अखेर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीने राज्याचे राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान ही बिनविरोध व्हावी, अशी मागणी होत होती.

Andheri East bypoll : अखेर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध?
X

Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East Assemly Election) मतदारसंघाचे आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. यामध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena Uddhv Balasaheb Thackeray) गटाकडून ऋतूजा लटके (Rutuja Latake) यांना तर भाजपने मुरजी पटेल (Muraji Patel) यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यापार्श्वभुमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackray) यांनी भाजपने ही निवडणूक लढवू नये, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून भाजपशी चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अखेर भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घोषणा केली.

भाजप ने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ, असं म्हटलं होतं. मात्र राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढवू नये, असं म्हटलं होतं. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भाजपला निवडणूक न लढवण्याची विनंती करावी, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने केंद्रीय मंडळाशी चर्चा केली. त्यामुळे अखेर भाजपने या निवडणूकीतून माघार घेण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपची माघार, पण निवडणूक होणार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीतून भाजपने माघार घेतली आहे. मात्र यानंतरही अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. मात्र ऋतूजा लटके आणि मुरजी पटेल वगळता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अपक्ष आणि नोंदणीकृत नसलेल्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या माघारीनंतरही अपक्ष आणि नोंदणीकृत पक्ष काय भूमिका घेतील, यावर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीचे गणित ठरणार आहे.

Updated : 17 Oct 2022 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top