Home > Politics > अमृता फडणवीस राज्यपाल कोश्यारींचे गुणगान का गातायत...?

अमृता फडणवीस राज्यपाल कोश्यारींचे गुणगान का गातायत...?

अमृता फडणवीस राज्यपाल कोश्यारींचे गुणगान का गातायत...?
X

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. राज्यपाल हे मनाने मराठी माणूस आहे, असे ते मानतात. महाराष्ट्रात आल्यावर ते मराठी शिकले आहेत. मी राज्यपालांना वैयक्तिकरित्या ओळखते. असं म्हणत त्यांनी राज्यपालाची बाजू घेतली आहे. आता अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू घेतल्यानंतर समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिकिया येत आहेत.

एकीकडे राज्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अमृता फडणवीस यांनी त्यांचं गुणगान गायल्याने राजकीय वाटातावरण चांगलेच तापले आहे. अमृता फडणवीस राज्यपालाविषयी बोलताना म्हणाल्या की, ''राज्यपालांना मराठी आवडते. मी राज्यपालांना वैयक्तिकरित्या ओळखते. त्यांना मराठीवर मनापासून प्रेम आहे. हे मी स्वतः अनुभवले आहे, पण असे अनेकवेळा घडले आहे की त्यांनी काहीतरी बोलले असेल आणि काहीतरी वेगळे असेल, पण ते मनाने मराठी माणूस आहे.

भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गेल्या शनिवारी औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, पूर्वी जेव्हा तुम्हाला विचारले जायचे की तुमचा आयकॉन कोण, तेव्हा उत्तर जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी असायचे. आता तुम्हाला महाराष्ट्रात आणखी पाहण्याची गरज नाही कारण तेथे अनेक आयकॉन आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील प्रतिक आहेत. आता बी. आर. आंबेडकर आणि नितीन गडकरी आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे आमचे देव असल्याचे सांगितले. पण राज्यपालाच्या या बेताल वक्तव्यानंतर सर्वत्र वातावरण चांगलेच तापले आहे.

''अॅमेझॉन पार्सल' केंद्राने परत घ्यावे'' उद्धव ठाकरे

केंद्र सरकारने राज्यपाल म्हणून पाठवलेले 'अॅमेझॉन पार्सल' परत घ्यावे. हे पार्सल आम्हाला महाराष्ट्रात नको आहे. केंद्र सरकारने हा नमुना दुसऱ्या ठिकाणी पाठवावा किंवा वृद्धाश्रमात पाठवावा. त्यांच्या वक्तव्याला तमाम महाराष्ट्रप्रेमींनी विरोध करावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या लोकांनाही हवे असेल तर तेही सहभागी होऊ शकतात. असं देखील ते म्हणाले होते. सध्या राज्यपालाच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्थरातून टीका होत आहे. राज्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू घेतल्यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिकिया येत आहेत.

Updated : 25 Nov 2022 12:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top