Home > Politics > अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत का?

अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत का?

अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत का?
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे मध्यंतरी एका फेसबुक पोस्टमुळे चांगलेच चर्चेत आले होते. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्यांनी आपण एकांतवासात जात असल्याचं म्हटलं होतं.

अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यात सक्रीय झालेले दिसत आले आहेत. मात्र, अचानक अमोल कोल्हे यांनी आपल्या काही निर्णयांची फेरविचार करण्याची भाषा केल्याने याचे कारण काय अशी चर्चा आता सुरू झाली होती. काही लोक ते पक्ष सोडणार असल्याचंही बोलत होते. आता त्यांचा हा अज्ञातवास संपला आहे. त्यामुळं ते का अज्ञातवासात गेले होते? ते इतके दिवस कुठं होते? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी केलेली खास बातचीत पाहा काय म्हणाले अमोल कोल्हे

काय पोस्ट होती अमोल कोल्हे यांची?

" सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!

घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा! त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!!

टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही"

Updated : 2021-11-15T21:14:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top