Home > Politics > अमोल कोल्हे विक्रम गोखलेंवर संतापले, म्हणाले '...याला भगव्याचच रक्त द्या'

अमोल कोल्हे विक्रम गोखलेंवर संतापले, म्हणाले '...याला भगव्याचच रक्त द्या'

अमोल कोल्हे विक्रम गोखलेंवर संतापले, म्हणाले ...याला भगव्याचच रक्त द्या
X

कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्याने देशात नवा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तिच्या या वक्तव्याला आता अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील समर्थन दिलं आहे.

या सर्व वादात आता खासदार अमोल कोल्हे यांनी विक्रम गोखले सह, कंगना रणौतवर टीका केली आहे. ते मॅक्समहाराष्ट्रच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात बोलत होते. कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी विक्रम गोखले यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.


Updated : 16 Nov 2021 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top