Home > Politics > भाजपच्या मदतीला धावले अंबादास दानवे

भाजपच्या मदतीला धावले अंबादास दानवे

भाजपच्या मदतीला धावले अंबादास दानवे
X

दहिसरमध्ये भाजपच्या (bjp) कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचे विधानपरिषदेत जोरदार पडसाद उमटले. यावेळी भाजपच्या मदतीला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) धावून आल्याचे पहायला मिळाले. विधानपरिषदेत अंबादास दानवे यांनी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. यामध्ये दहिसर येथे भाजप कार्यकर्त्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या ५५ कार्यकर्त्यांनी हल्ला केला असून त्यात भाजपचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अंबादास दानवे भाजपच्या मदतीला धावून आल्याचे पहायला मिळाले.

यावेळी प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे या मुद्द्यावरून आक्रमक झाले. प्रवीण दरेकर म्हणाले की, या प्रकरणातील ५५ कार्यकर्त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही त्या सिनियर DCP वर आणि शताब्दी हॉस्पिटलमध्ये admit करून न घेतल्याबद्दल डीनला निलंबित करावे, अशी मागणी केली. यावेळी दरेकर म्हणाले की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. त्यामुळे सरकारने कारवाई करावी.

यानंतर अनिल परब (Anil Parab) म्हणाले, आधी आम्ही जात्यात होतो आता तुम्ही जात्यात आहात. त्यामुळे संबंधित आमदारावर कारवाई करावी. यानंतर कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही, असं आश्वासन मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलं. मात्र अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या की, यामागे जे सूत्रधार असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले.

Updated : 20 March 2023 10:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top