- शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोप भोवले, सत्तारांचे मंत्रीपद हुकलं
- लवासा प्रकरणी पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- नेदरलँड्समधे रंगला मिलान समर फेस्टिव्हल
- शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागाच्या आरोपावर सत्तार यांचे उत्तर
- बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले झाड पडले...
- सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही आशा नाही- कपील सिब्बल
- भंडारा बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- #Muskanbulletin : महागाईने सामान्यांचा संताप, विस्तार रखडल्याने शिंदे सरकार अडचणीत
- मंत्र्यांचे सर्वाधिकार सचिवांना?, अखेर सरकारचे स्पष्टीकरण
- महागाई आणि दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर

मविआ सरकारचे गेल्या 15 दिवसातील सर्व निर्णय शिंदे सरकारकडून स्थगित
नव्या शिंदे सरकारने बोलावलेलं विशेष अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. लोकांना दाखवण्यापुरत भाषण करून बाहेर त्याच्या उलट निर्णय घेतले जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे असाही ते म्हणाले.
X
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अधिवेशन संपल्यावर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले. "दोन दिवस अधिवेशन झालं. त्यात विधानसभा अध्यक्षपदाची रखडलेली निवडणूक आणि विश्वासदर्शक ठराव अशा गोष्टी पार पडल्या. महाविकास आघाडीत संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी कडे येणार होतं. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि मी स्वतः अशी आम्ही सदस्यांशी चर्चा केली आणि मला विरोधी पक्षाची भूमिका दिली
विरोधी पक्षनेते पद ही जबाबदारी खुप मोठी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदांप्रमानेच विरोधी पक्षनेत्याची पण भूमिका अत्यंत महत्वाची असते. सर्वांना विश्वासत घ्यावं लागतं. आपल्या राज्यात विरोधी पक्षनेत्यांची भूमिका ठाम आहे आणि मोठी आहे. माझ्यावर आलेली ही जबाबदारी निश्चित मोठी आहे. माझा प्रयत्न योग्य काम करण्याचा राहील. चुका झाल्या असतील तर त्यावर बोट ठेवायचं काम आम्ही करू." अस ते म्हणाले. ,
याशिवाय पेट्रोल डिझेल वरील कर कमी करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " त्या काळात गॅस वरचा टॅक्स कमी केला आणि साडे तेरा टॅक्स आपण 3 टाकायवर आणला. एक गोष्ट खरी आहे की नरेंद्र मोदी यांची सरकार जिथे जिथे आहे तिथे त्यांनी सांगितले होतं. .कोरोनाची दोन वर्ष कशी गेली हे सगळ्यांना माहीत आहे. मंत्रिमंडळ मध्ये नवीन सरकार निर्णय टॅक्स कमीवर 6घेणार आहे. वाढ ही होताच असते, असा खर्च होत असताना टॅक्स कमी करता येतो. सरकार आल्यावर जनतेला आम्ही तुमच्या साठी निर्णय घेतला हे दाखवायचा होता. सरकार बदल्यांनायर नवीन सरकार आल्यावर मागच्या महिन्यात घेतलेल्या निर्णयावर विचार केला जातो. सभागृहात त्यांनी वक्तव्य केलं की राज्याच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ."
शिवाय मुख्यमत्र्यांनी बाळासाहेबांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर कधीच युती करणार नाही या भाषणाची आठवण करून दिल्यावर अजित पवार म्हणाले, "शिवसेनेने सांगितले की ज्यांच्या सोबत 25 वर्ष युती केली त्यांच्या सोबत जमलं नाही. ती 25 वर्षे सडली. त्यामुळे जेव्हा नवी राजकीय भूमिका स्वीकारली जाते तेव्हा जुनी भूमिका आपोआप मागे पडली जाते. 2014 च्या निवडणूकीत शिवसेनेला किती खाती दिली होती हे सगळ्यांना माहित आहे. शिवसेनेचे अनेक नेते बोलायचे आम्ही राजीनामा खिशात घेऊन फिरतो. आम्ही या गोष्टीला फार महत्व देणार नाही
या शिवाय मुख्यमंत्र्यांच्या एकोप्याच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की आताच मी एक जिआर पहिला की जिल्हा नियोजन समितीबद्दल मागच्या 15 दिवसात घेतलेले सगळे निर्णय नव्या सरकारकडून स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांना दाखवायला भाषण करण आणि प्रत्यक्ष कृती मात्र त्याविरोधात करण याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.