Home > Politics > भाजपचे पुढील टार्गेट सर्व प्रादेशिक पक्ष, जे.पी.नड्डा यांचा इशारा

भाजपचे पुढील टार्गेट सर्व प्रादेशिक पक्ष, जे.पी.नड्डा यांचा इशारा

भाजपचे पुढील टार्गेट सर्व प्रादेशिक पक्ष, जे.पी.नड्डा यांचा इशारा
X

देशात भाजपसमोर उभा राहण्यासाठी कोणताही राष्ट्रीय पक्ष नाहीये, आणि जे आहेत ते देखील संपतील, फक्त भाजप उरेल असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे. एवढेच नाही तर प्रादेशिक पक्ष घराणेशाही जपणारे असल्याने भाजपला आता ही घराणेशाही संपवायची आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना लवकरच संपणार आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. काँग्रेसने प्रादेशिक भावना कधीच समजून घेतल्या नाहीत, त्यामुळे दक्षिणेतून ते उखडले गेले, तसेच ते देशातही कुठेच नाहीयेत, हा पक्ष केवळ बहिण-भावाचा पक्ष उरला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर भाजपचे पुढील टार्गेट देशातील प्रादेशिक पक्ष आहेत, असेही संकेत नड्डा यांनी दिले आहे. देशातील विविध राज्यातील राजकीय पक्षांनी प्रादेशिक अस्मितेची झालर पांघरत घराणेशाही राबवली असा आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर हीच घराणेशाही संपवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे, असे सांगत भाजपचे पुढील टार्गेट प्रादेशिक पक्ष आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची नावं आवर्जून घेतली आहेत.


Updated : 1 Aug 2022 3:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top