Home > Politics > पुण्याचा निकाल लागू दे मग सांगतो, अजित पवार यांचा इशारा

पुण्याचा निकाल लागू दे मग सांगतो, अजित पवार यांचा इशारा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत भाजपला दणका दिल्यानतंर आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीबाबतही अजित पवार यांनी इशारा दिला आहे.

पुण्याचा निकाल लागू दे मग सांगतो, अजित पवार यांचा इशारा
X

राज्यातील पदवीधर (Graduate Election) आणि विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद या तीन जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला. त्यानंतर मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक भाजप (BJP vs Mahavikas Aghadi) आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणूकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र निकाल बाकी आहे. त्यापार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला इशारा दिला आहे.

आम्ही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि अमरावतीच्या जागा खेचून आणल्या. कोकणमध्ये शिवसेनेचे असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना फोडून त्यांना तिकीट दिले. ती जागाही आमचीच होती. तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे (Vikram kale) तर नाशिकमध्ये सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी विजय मिळवला. जर महाविकास आघाडीने म्हात्रे आणि तांबे यांना तिकीट दिले असते तर पाचही जागा आम्हीच जिंकल्या असत्या, असं अजित पवार म्हणाले.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ (Kasaba peth bypoll) आणि चिंचवड पोटनिवडणूकीत (Chinchwad bypoll) कुणाकुणाला किती दिवस थांबावं लागलं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्या निवडणूकीत काय झालं? मतदान करु नका, असं कुणी सांगितलं? मतदान करताना काय झालं? कोण कुणाला घेऊन फिरलं? हे सगळं मी सांगणार आहे.

पुण्याच्या निवडणूकीचे निकाल काय लागतील माहिती नाही. पण एकदा निकाल लागू दे मग सांगतो, असं अजित पवार म्हणाले.

Updated : 1 March 2023 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top