Home > Politics > केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अहमदनगर येथे शिवसैनिक आक्रमक

केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अहमदनगर येथे शिवसैनिक आक्रमक

केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अहमदनगर येथे शिवसैनिक आक्रमक
X

अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे निर्देश पोलिसांना देण्यात आले, यावरून राज्यभर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अनेक जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

शिवससैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान अहमदनगर येथील शिवसैनिक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याच्या तयारीत आहेत. सध्या कोतवाली पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Updated : 24 Aug 2021 5:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top