Home > Politics > माझ्या हृदयात राधाकृष्ण विखे पाटील हेच मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार याचं वक्तव्य

माझ्या हृदयात राधाकृष्ण विखे पाटील हेच मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार याचं वक्तव्य

मी हनुमान महाराजासारखी छाती चिरून दाखवली तरी त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हेच दिसतील, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले.

माझ्या हृदयात राधाकृष्ण विखे पाटील हेच मुख्यमंत्री, अब्दुल सत्तार याचं वक्तव्य
X

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाविषयी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच अजित पवार भावी मुख्यंमत्री म्हणून धाराशिव, नागपूर आणि मुंबई बॅनर लागले होते. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपूरमध्ये लागले होते. त्यामुळे राज्यात चार वर्षात तिसरे मुख्यमंत्री मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांना तुम्हाला कोण मुख्यमंत्री व्हावं वाटतं, असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव घेतले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी जर हनुमान महाराजा सारखा एखादा भक्त असतो. तर छाती चिरून दाखवली असती की, मुख्यमंत्री पदासाठी माझ्या हृदयामध्ये माझे परममित्र विखे पाटील आहेत. विखे पाटील मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा असल्याचे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले.

अब्दुल सत्तार यांनी पुढे म्हटले की, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र विखे पाटील हे माझे परममित्र आहेत. त्यामुळे आपला मित्र मुख्यमंत्री व्हावा, असं कुणाला वाटत नाही. त्याप्रमाणेच विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे, असं मत सत्तार यांनी व्यक्त केले.


Updated : 27 April 2023 5:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top