Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांची अडचण, कृषी दिनाच्या ट्वीटमधून उघड

देवेंद्र फडणवीस यांची अडचण, कृषी दिनाच्या ट्वीटमधून उघड

गेल्या दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर या सत्तानाट्यावर पडदा पडला. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच कृषी दिनाच्या पोस्टमधून देवेंद्र फडणवीस यांची अडचण उघड झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची अडचण, कृषी दिनाच्या ट्वीटमधून उघड
X

गेल्या दहा दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर या सत्तानाट्यावर पडदा पडला. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच कृषी दिनाच्या पोस्टमधून देवेंद्र फडणवीस यांची अडचण उघड झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडानंतर त्यांना भाजपने मुख्यमंत्री पद तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यंमत्री पदावरून उपमुख्यमंत्री असं डिमोशन झाल्याची चर्चा आहे. त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 1 जुलै रोजी कृषीदिनानिमीत्त देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासोबत फोटो टाकून कृषीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस इतर वेळी वापरत असलेले त्यांचे पद वापरले नसल्याचे दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

फडणवीस यांनी व्हिडीओही ट्वीट केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागल्याने त्यांच्या मनात नाराजी आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचा पक्षनेतृत्वाने गेम केल्याची चर्चा आहे. तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद भुषवल्याने आता उपमुख्यमंत्री पदी डिमोशन झाल्याने फडणवीस नाराज आहेत. त्यामुळे याआधी विरोधीपक्षनेते आणि त्यापुर्वी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री असं लिहीणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टमध्ये आता पदाचा उल्लेख केला नसल्याचे दिसून आले आहे.

Updated : 1 July 2022 11:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top