Home > Politics > अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर, भाजप विरुध्द शिवसेना रंगणार सामना

अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर, भाजप विरुध्द शिवसेना रंगणार सामना

अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर, भाजप विरुध्द शिवसेना रंगणार सामना
X

शिवसेना ( shivsena ) आमदार रमेश लटके (Ramesh लटके) यांच्या निधनानंतर अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने वेळापत्रक जारी केले आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजप (BJP) विरुध्द शिवसेना सामना रंगणार आहे.

रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. मात्र आता अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भाजप विरुध्द शिवसेना आमने-सामने येणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची घोषणा केली. यामध्ये 7 ऑक्टोबर पासून निवडणूक अर्ज भरण्यात येणार आहे तर 14 ऑक्टोबर 2022 ही निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाणणी होणार आहे. 17 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर उध्दव ठाकरे (uddhav thackeray ) यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ही निवडणूक थेट शिवसेना विरुध्द भाजप अशीच रंगणार असल्याचे निश्चित आहे.

आशिष शेलार (ashish shelar ) यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी या पोटनिवडणूकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच या निवडणूकीसाठी शिंदे गटाचाही पाठींबा असल्याचे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

Updated : 3 Oct 2022 7:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top