Home > Politics > आम्हालाही आरे ला कारे करता येते, चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना इशारा

आम्हालाही आरे ला कारे करता येते, चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना इशारा

केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.

आम्हालाही आरे ला कारे करता येते, चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना इशारा
X

courtesy social media

केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना पंतप्रधान मोदींनी स्थान दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी राणेंवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खुप मोठी आहे आणि ती वाढत राहणार आहे, असा टोला लगावला होता. यावर संजय राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. राणेंच्या कर्तृत्वाची उंची जास्त असल्यानेच शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला त्यांनी लगावला.त्याचबरोबर संजय राऊत यांच्या भावाला राज्य सरकारमध्ये लवकरच मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा मी करते, जेणे करून आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे भाग्य प्राप्त होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही वाघ यांनी समाचार घेतला आहे. एवढेच नाही तर भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवावे नाहीतर आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरे ला कारे करण्याची भाषा पण वापरता येते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Updated : 2021-11-23T15:13:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top