Home > Politics > २०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवताहेत - आदित्य ठाकरे

२०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवताहेत - आदित्य ठाकरे

२०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवताहेत - आदित्य ठाकरे
X

बंडखोर आमदार दीपक केसरकरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेदरम्यान बंडखोरांवर तोफ डाग आदित्य ठाकरेंनी २०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवताहेत, असा टोला लगावला आहे.

शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा करत आहेत. आदित्य ठाकरे यांची तोफ शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात धडाडली. २०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवताहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीत मध्ये शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांचा मेळावा घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडली. इथल्या त्या व्यक्तीबद्दल बोलणार नाही. काही बोललो तर वय काढतात माझं, असा उपहासात्मक टोला देखील लगावला. गद्दार असा शिक्का माथ्यावर घेऊन फिरताहेत. त्या गद्दारांनी इथे यावं आणि ही गर्दी बघावी आणि लोकांच्या मनात काय भावना आहे ती ओळखून घ्यावी, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना नाव न घेता दिला. माझ्या निष्ठा यात्रेला, शिव संवाद यात्रेला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. लोकं मला सांगताहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत, मातोश्रीसोबत आहोत. आनंद आहे मला; पण दुसरीकडे गद्दारी केल्याने वाईट देखील वाटतंय. लोकांना विचारतोय मी आम्ही काही चूक केली का? चूक केली असेल तर सांगा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, आमची एक चूक झाली, आम्ही न बघता त्या ४० लोकांना कडाडून मिठी मारली, आपलं समजून मिठी मारली. त्यांच्या हातातील खंजीर आम्हाला दिसलं नाही. ते खंजीर त्यांनी छातीत न मारतात पाठीत वार केला, हे आमचं न बघणं चुकलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे ते बोलताना म्हणाले आमची दुसरी चूक म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही. आम्ही केवळ समाजकारण केलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Updated : 1 Aug 2022 1:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top