Home > Politics > तेजस उद्धव ठाकरेंच्या राजकीय लान्चिंगची चर्चा

तेजस उद्धव ठाकरेंच्या राजकीय लान्चिंगची चर्चा

तेजस उद्धव ठाकरेंच्या राजकीय लान्चिंगची चर्चा
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचे राजकीय लाँचिंग बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: दसरा मेळाव्यात केले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि ठाकरे घराण्याचा वारसदार म्हणून आदित्य ठाकरेंची ओळख आहे. पण उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे हा मात्र अजून प्रसिद्धीच्या झोतात आलेला नाही. राजकारणापासून लांब असलेल्या तेजस ठाकरे यांच्या राजकीय लाँचिंगची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे.

या चर्चेला निमित्त ठरले आहे तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेली जाहिरात..उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सामनामधून तेजस ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. "ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा" या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या जाहिरातीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तेजस ठाकरे यांचे लाँचिंग करण्याची रणनीती आखली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीली प्रतिक्रिया देताना मिलिंद नार्वेकर यांनी सांगितले की, "आदित्य ठाकरे हे सुनील गावस्कर यांच्यासाऱखे संयमी आहेत. तर रिचर्ड जसे बॉल सीमापार उडवायचे तसे तेजस ठाकरे आक्रमक आहेत. तेजस ठाकरे आक्रमक तसेच निश्चयी देखील आहेत. सामनामधील जाहिरातीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ही कौटुंबिक जाहिरात आहे, " असेही मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले आहे.

Updated : 7 Aug 2021 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top