Home > Politics > गुलाबराव पाटलांच्या गडात आदित्य ठाकरेंचा दौरा

गुलाबराव पाटलांच्या गडात आदित्य ठाकरेंचा दौरा

शिवसेने विरुध्द 'बंडखोरी' की 'उठाव' गुलाबराव पाटलांविरुद्ध आदित्य ठाकरे काय बोलणार...

गुलाबराव पाटलांच्या गडात आदित्य ठाकरेंचा दौरा
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध 'बंड' पुकारणारे आणि शिवसेनेच्या बंडाला 'उठाव' स्वरूप देणारे एकेकाळी शिवसेनेची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा तिसरा टप्प्यातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्या दौरा उद्या पासून म्हणजे 9 आगस्ट क्रांती दिवसापासून सुरू होणार आहे.

शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे सरळ सरळ दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सध्या सुरू आहे, मात्र शिवसेनेच्या पक्षाच्या पुनरबांधणी साठी राज्यभर उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे दौरे सुरू केले आहेत.पहिला टप्पा मराठवाडा, दुसरा टप्पा कोंकण आणि आता तिसरा टप्प्यात उत्तर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यात खान्देशातील जळगाव जिल्हा हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. जळगाव जिल्ह्यात 11 मतदार संघांपैकी सर्वाधिक पाच मतदार संघ शिवसेनेने ताब्यात होते. मात्र राज्यातील सत्तांतरामध्ये जिल्ह्यातील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व चारही आमदार ठाकरेंविरुद्ध बंड पुकारून शिंदे गटात गेले आहेत. यात जळगाव ग्रामीण मतदार संघाचे गुलावरव पाटील , पारोळा एरंडोल मतदार संघाचे चिमणराव पाटील, पाचोरा भडगाव चे किशोर पाटील, मुक्ताईनगर चे चंद्रकांत पाटील, चोपडयाच्या आमदार लता सोनवणे ह्यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार संपूर्ण शिवसेनाच घेऊन गेले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील अनेक पदाधिकारी शिंदे गटाचे नेतृत्व मान्य केलं आहे. मात्र पाचोरा भडगाव, पारोळा एरंडोल, आणि चोपडा ह्या मतदार स संघात ठाकरे गटातील शिवसेना वर अजून तरी विश्वास ठेवला आहे. शिवसेनेची आणखीन पडझड होऊ नये यासाठीच आदित्य ठाकरे यांचा हा जळगाव जिल्हा महत्वाचा मनाला जात आहे.

गुलाबरावांविरुद्ध आदित्य ठाकरे काय बोलणार -

शिवसेनेमध्ये 'बंड' नाही तर हा 'उठाव' आहे, असं जाहीर भूमिका विधानसभेच्या विश्वासदर्शक ठरवावेळी गुलाबराव पाटील यांनी मांडली होती, तसच राष्ट्रवादीचे नेते फिरत असतांना उद्धव ठाकरे नाही तर आदित्य ठाकरेंनी तरी फिरलं पाहिजे होत अशी टीका ठाकरे परिवारावर केली होती, आता ह्याला आदित्य ठाकरे गुलबारावांच्या या वक्तव्याला त्यांच्याच बालेकिल्ल्यात कसं उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. गुलाबराव पाटील यांचा गड असलेल्या मतदार संघातील धरणगाव येथ आदित्य ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.

त्याच बरोबर पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या विरुद्ध पाचोरा येथ सभा होणार आहे. तसेच चिमणराव पाटील यांच्या पारोळा या मतदार संघातही ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभांमध्ये ठाकरे काय टीका करतात यावरही पुढचे राजकीय समीकरण अवलंबून आहेत.

शिवसेनेचा कोणताही मोठा नेता नसतांना तयारी-

शिंदे गटात जिल्ह्यातील प्रमुख नेते गुलाबराव पाटील यांच्यासह चिमणराव पाटील, किशोर पाटील गेल्याने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची जबादारी शिवसेनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवर येऊन पडली आहे. ह्या फळीत कोणताही मोठा नेता नाही. तरीही ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू आहे. ह्या दौऱ्याची सर्व भिस्त युवा सेनेवर आहे. त्यामुळे कोणताही मोठा नेता नसतांना आदित्य ठाकरे यांचा दौरा कसा होतो याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.

कसा आहे आदित्य ठाकरे यांचा दौरा-

युवा सेनेचे आदित्य ठाकरे हे उद्या 9 आगस्ट ला सकाळी 10:15 ला जळगाव विमान तळावरून आगमन झाल्यावर अजिंठा चौफुली स्वागत करण्यात असून नेरी नाका, टॉवर चौक, नेहरू चौक, काव्यरत्नवली चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर पाचोरा येथ सभा त्यानंतर धरणगाव आणि पारोळा येथ जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी धुळे येथ सभा होणार आहे. त्यानंतर रात्री मालेगाव येथे शिवसेनेचे माजी मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथ संवाद साधणार आहे. तसेच भिवंडी ग्रामीण मतदार संघातही मतदारांशी संवाद साधणार आहे.

Updated : 8 Aug 2022 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top