Home > Politics > सरकार कधी तरी काम करेल का ? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सरकार कधी तरी काम करेल का ? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सरकार कधी तरी काम करेल का ? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
X

शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरें यांनी शिवसेना भवनात आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केलीय. प्रामुख्याने वेदांता फॉक्सकॉन तसेच इतर प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सरकार आणि बेकायदेशीर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कधी तरी महाराष्ट्रासाठी काम करेल का ? असा सवाल केलाय.

वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्याने शिंदे-फडणवीस यांना आदित्य ठाकरे यांनी लक्ष केलं. प्रकल्प गुजरातला गेला याचं वाईट वाटत नाही, पण आपल्या महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगार गेला याच वाईट वाटत. याबाबत कोणीच बोलत नाही. आमच्या महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प गेल्याचा आरोप करण्यात आला. आम्ही माहिती अधिकार कायद्या अंतर्गत आम्ही माहिती घेतली दीड महिन्यांनी त्याचं उत्तर आलं, त्याचा पुरावाच मी घेऊन आलो आहे. मुख्यमंत्री यांवर काही बोलत नाही, माझं त्यांना खुल आवाहन आहे सामोरा समोर माध्यमांसमोर चर्चा करावी. असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा दिल.

Updated : 2022-11-29T20:08:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top