Home > Politics > खासदार राहुल शेवाळे यांनी देशाच्या विरोधात काम केलंय – रुपाली पाटील ठोंबरे.

खासदार राहुल शेवाळे यांनी देशाच्या विरोधात काम केलंय – रुपाली पाटील ठोंबरे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी महिलेसोबत असणारे संबंध फेटाळून लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे ह्या आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांच्यावरती टीका देखील त्यांनी केली आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी देशाच्या विरोधात काम केलंय – रुपाली पाटील ठोंबरे.
X

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी, रिया चक्रवती यांच्या फोनवर ४१ AU नावाने कॉल आले होते असे वक्तव्य करुन आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप केले होते. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक होऊन, राहुल शेवाळे यांचे महिलेसोबत असणाऱ्या संबंधाबाबत आरोप केले होते. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित महिला ही फॅशन डिझायन क्षेत्रात काम करत असून तिचे दाऊदशी संबंध असल्याचे वक्तव्य शेवाळे यांनी केले आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी आक्रमक होऊन शेण स्वता खाता, आणि दाऊदशी संबंध आहे म्हणून सांगता अशी टीका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी राहुल शेवाळे यांच्यावरती केली. तसेच रुपाली पाटील पुढे म्हणाल्या की, त्या महिलेचे संबंध दाऊद बरोबर असल्याचे सांगितल्यामुळे शेवाळे यांचं महिलेसोबत वरचेवर बोलणं होतं असयाचं, त्यामुळे दाऊदच्या हस्तकाशी संबंध ठेऊन देशातील माहिती पुरवली असा अर्थ घ्यायचा का? असा सवाल रुपाली ठोंबरे-पाटील यांनी उपस्थित केलाय.

तसेच शेवाळे यांच्यावर आरोप केलेल्या महिलेचा दाऊदशी संबंध नाही, परंतू राहुल शेवाळे दाऊद यांच्यावरती आरोप करत असतील तर शेवाळे यांनी देशाच्या विरोधात काम केलंय त्याच्यावर कारवाई व्होयाला पाहिजे असेही रुपाली पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Updated : 25 Dec 2022 11:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top