Home > Politics > गोदी मिडीया थकत का नाही?

गोदी मिडीया थकत का नाही?

गोदी मिडीया थकत का नाही?
X

सत्तेमधील नेत्यांची तळी उचलणाऱ्या गोदी मीडियावर सातत्याने टीका होत असते. असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाची रविवारी रात्री पाहणी केली. यानंतर एबीपी न्यूजच्या अँकर रुबिका लियाकत यांनी एक ट्विट केले, यामध्ये त्या म्हणतात की, "आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परतले आणि रात्री जवळपास ८.४५ वाजता कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि सुरक्षेच्या शिवाय नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पाहणी केली आणि तिथे जवळपास १ तास ते थांबले. यांच्या शब्दकोशात थकवा हा शब्द खरंच नाहीये", असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या ट्विटवर पत्रकार प्रशांत टंडन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. "नोयडा मीडियाला माझा सवाल आहे की, ऑफिस आणि स्टुडिओमध्ये तर तुमचे मालक आणि कर्मचारी भक्त आहेतच, पण घरी पोहोचल्यानंतरही ट्विटरवरुन भक्ती का, तुम्ही लोक थकच नाहीत का?" असा खोचक सवाल त्यांनी विचारला.

रुबीका लियाकतच्या या ट्विटवर अनेकांनी कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, पण काही ट्विटकर्त्यांनी काही कटू सवाल देखील उपस्थित केले आहेत. यातील काही ट्विट्स पाहा...Updated : 2021-09-27T14:04:36+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top