Home > Politics > आसाम-मिझोराममधील संघर्ष, आसामकडून मिझोरामची अघोषित कोंडी?

आसाम-मिझोराममधील संघर्ष, आसामकडून मिझोरामची अघोषित कोंडी?

आसाम-मिझोराममधील संघर्ष, आसामकडून मिझोरामची अघोषित कोंडी?
X

आसाम आणि मिझोराममध्ये सीमावादावरुन निर्माण झालेला संघर्ष गंभीर वळणावर पोहोचला आहे. या संघर्षात आसामचे 5 पोलीस आणि एक नागरिक ठार झाल्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला आहे. 26 जुलै रोजी आसाम आणि मिझोराममधील सीमेवर संघर्ष झाला. त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. आता आसाममधील काही अज्ञात समाजकंटकांनी मिझोरामला येणारे रेल्वे ट्रॅक उखडून टाकले आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 306 सुद्धा बंद केला आहे, असा आरोप मिझोरामच्या गृहसचिवांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारने आता यामध्ये हस्तक्षेप करुन बंद करण्यात आलेले रस्त मोकळे करावे, अशी मागणी केली त्यांनी आपल्या पत्रात केली आहे. या कोंडीमुळे मिझोरामला येणारे नागरिक अडकून पडले आहेत तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठाही रखडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हे रस्ते सुरू करावे अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.

कोणतेही सरकार किंवा कोणीही व्यक्ती अशाप्रकारे रस्ते रोखून धरुन शकत नाही, त्यामुळे केंद्र सरकारने आसाम सरकारला आदेश देऊन रस्ते तातडीने सुरू करण्यास सांगावे. तसेच रेल्वे ट्रॅक दुरूस्त करुन द्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

नेमका वाद काय?

आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्यांची सीमा 165 किलोमीटर लांब आहे. या सीमेवर आसामचे तीन जिल्हे कछार, करीमगंज हैलाकांडी हे जिल्हे तर मिझोरामचे ऐझॉल, कोलासिब आणि मामित हे जिल्हे आहेत. पण मिझोराम ब्रिटीशपूर्व काळापासून आसामचा भाग होता. त्यानंतर मिझोराम हे 1972 मध्ये स्वतंत्र राज्य झाले. ब्रिटीशांनी त्यांच्या काळात मिझोरामची सीमा निश्चित करुन टाकली, पण ती तिथल्या लोकांना मान्य नव्हती. त्यानंतर मिझोराम स्वतंत्र राज्य झाले, पण सीमेवरील काही भागाचा वाद कायम राहिला. त्यानंतर परिस्थितीत जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला होता. पण या दोन्ही भागात पायाभूत सुविधा तयार करताना याआधीही वाद झाले आहेत. 2018मध्ये मिझोरामच्या विद्यार्थी संघटनेने या भागात झोपड्या बनवल्या. पण आसाम पोलिसांनी त्या तोडल्याने तेव्हाही वाद झाला होता.

26 जुलै रोजी हिंसाचार होण्याच्या दोन दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिलाँगमध्ये ईशान्येतील सर्व राज्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर दोन दिवसात आसामच्या पोलिसांनी मिझो नागरिकांवर हल्ला केल्याचा आरोप मिझोरामच्या पोलिसांनी केला आहे.

Updated : 29 July 2021 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top