Home > Politics > एका कॉलने राजकारणात खळबळ...

एका कॉलने राजकारणात खळबळ...

हॅलो, मला आशिष शेलारांना गोळी मारण्यास सांगितलंय, या एक कॉलने एकच खळबळ उडाली तर पोलिसांची चिंता वाढली आणि धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. ९३ बॉम्ब स्फोटातील (93 Bomb Blast) माफीच्या साक्षीदाराचा प्रताप, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात रात्री ८.५८ मिनिटांने आलेल्या एका कॉलने खळबळ उडाली.

एका कॉलने राजकारणात खळबळ...
X

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (Police Control Room) रात्री ८.५८ मिनिटांनी आलेल्या एक कॉलने पोलीसांची झोप उडाली. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आरोपीने खोटा कॉल केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. परवेझ कुरेशी आणि जावेद कुरेशी यांनी आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना गोळी मारण्यासाठी सांगितले आहे तरी मला मदत हवी असल्याचा एक कॉल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. हा कॉलनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला तात्काळ अटक केली. यावेळी आरोपी हा दारुच्या नशेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी मंजुर अहमद मेहमुद कुरेशी याला दारु पिण्यासाठी परवेझ कुरेशी आणि जावेद कुरेशी यांनी पैसे दिले नाहीत, या कारणावरुन आरोपीने अशा प्रकारचा कॉल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

आरोपी कुरेशी हा मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील (93 Bomb Blast) माफीचा साक्षीदार होता. तो आपली शिक्षा भोगून कारागृहाच्या बाहेर आला आहे. निर्मल नगर पोलिसांनी रात्री उशीरा कुरेशी याला अटक केली आहे. कुरेशी हा वांद्रे परिसरात राहतो. या वृत्ताला निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र काही दिवसांपासून पोलीसांच्या नियंत्रण कक्षाला (Police Control Room) खोटे कॉल येण्यामध्ये वाढ झालेली आहे. बुधवारी आलेल्या एका कॉलने तर पोलीसांची भंबेरीच उडवून दिली. पोलीसांनी या कॉलची तात्काळ दखल घेत ५२ वर्षीय आरोपी मंजुर अहमद मेहमुद कुरेशी याला निर्मलनगर पोलीसांनी , (Nirmal Nagar Police Station) अटक केली. त्याच्या चौकशीत समोर आलेल्या कारणाने पोलिसांनीही डोक्याला हात मारुन घेतला. मात्र असे कॉल पोलिस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) येत असतात. आणि पोलिसांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते.

Updated : 2 March 2023 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top