Home > Health > कोरोना संकट : महाराष्ट्रापेक्षा इतर 2 राज्यांमध्ये मृत्यू दर जास्त

कोरोना संकट : महाराष्ट्रापेक्षा इतर 2 राज्यांमध्ये मृत्यू दर जास्त

कोरोना संकट : महाराष्ट्रापेक्षा इतर 2 राज्यांमध्ये मृत्यू दर जास्त
X

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला लाटेपेक्षा संसर्गाचा वेग जास्त आहे, त्यामुळे चिंता वाढली असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी म्हटले आहे. दिल्लीत घेतलेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. काही राज्यांमधील कोरोनाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे पॉल यांनी सांगितले आहे. देशात गेल्या 24 तासात 96 हजार रुग्ण आढळले आहेत. तर 440 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग पहिल्या लाटेपेक्षा जास्त आहे. इतर राज्यांच्या तुलनेत काही राज्यांमधील स्थिती चिंताजनक आहे. पण संपूर्ण देशात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे असेही पॉल यांनी सांगितले.

पण महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांमधील परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. पंजाब आणि छत्तीसगडमध्ये रुग्णांचा मृत्यू दर चिंतेचा विषय आहे. तर महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. पण महाराष्ट्रात चाचण्यांची सरासरी संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागांमध्ये कोरोना चाचणीसाठी फिरत्या लॅबची सोय करा, ICMR मदत करेल, असेही महाराष्ट्र सरकारला सांगण्यात आल्याची माहिती पॉल यांनी दिली आहे.

Updated : 6 April 2021 1:01 PM GMT
Next Story
Share it
Top