Home > Health > देशातील 12 राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण, कशी घ्याल काळजी? काय म्हणाले डॉ. रणदीप गुलेरिया

देशातील 12 राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण, कशी घ्याल काळजी? काय म्हणाले डॉ. रणदीप गुलेरिया

देशातील 12 राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण, कशी घ्याल काळजी? काय म्हणाले डॉ. रणदीप गुलेरिया
X

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे Coronavirus Delta Plus Variant सरकारची चिंता अधिक वाढली आहे. देशातील बर्‍याच राज्यामध्ये या व्हायरसचं आगमन झालं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारची चिंता अधिक वाढली आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, तसेच मध्यप्रदेशसह 12 राज्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट बाधित ५० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लस हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कित्येक पटीने वेगाने पसरतो. या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे.

दरम्यान एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, डेल्टा प्लस व्हेरियंटला सामोरे जाण्यासाठी आपल्याला भूतकाळापासून शिकण्याची गरज आहे. (Why Delta variant is dangerous?) आता आपण संभाव्य तिसऱ्या लाटेसोबत तसेच डेल्टा प्लस सारख्या नवीन व्हेरियंट सोबत लढण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आता आपण काय करू शकतो. हे पाहणे महत्त्वाचे आहे. भूतकाळात घेतलेल्या धड्यांपासून आता लक्ष केंद्रित करून आपण आपली सार्वजनिक आरोग्ययंत्रणा कशी मजबूत करू शकतो. यावर विचार करणे आवश्यक आहे. Is Delta Plus variant dangerous?

उत्तराखंडमधील नैनीताल येथील आरोग्य विभाग या नवीन व्हेरियंटमुळे अधिक सतर्क झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणूशास्त्र विभागामार्फत वेळोवेळी जिल्ह्यातील १५ नमुने राष्ट्रीय रोग नियंत्रण पुणे मधील केंद्राकडे पडताळणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच झारखंडमध्ये देखील या व्हेरियंटपासून वाचण्यासाठी कडक पाऊल उचलली आहेत.

सोबतच ज्या राज्यांमध्ये या विषाणूने लोक संक्रमित झाले आहेत. त्या राज्यातील लोकांना दुसऱ्या राज्यात प्रवेश करताना काही नियमांचं पालन तसेच चाचणी करणं बंधनकारक असणार आहे. What is meant by Delta Plus variant? चाचणी पॉझीटीव्ह आली तर त्या सर्व व्यक्तींना कोव्हिड रुग्णालयात दाखल करून चोवीस तासांच्या आत संपर्क ट्रेसिंग करण्याबाबत तात्काळ सूचना देण्यात आल्या आहेत.

डेल्टा प्लस व्हेरियंटची लक्षणे (delta plus variant symptoms)

सामान्य लक्षणांमध्ये कोरडा खोकला, ताप आणि थकवा यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त, गंभीर लक्षणांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, व बोलताना अडचण निर्माण होणे. Does the Delta variant have different symptoms?

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली लक्षणे - त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल होणे, घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, अतिसार आणि डोकेदुखी.

Updated : 2021-06-28T15:51:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top