Home > Entertainment > Urfi Javed : उर्फी जावेद ला अटक? मुंबई पोलीसांनी उघडं पाडलं नाटक

Urfi Javed : उर्फी जावेद ला अटक? मुंबई पोलीसांनी उघडं पाडलं नाटक

आपल्या उलट सुलट फॅशन ट्रेंड मुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेद ला दोन महिला कॉन्स्टेबल अटक करून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये बसवून घेऊन जात आहेत, असा व्हिडीयो तुमच्या सोशल मीडीया अकाऊंट वर आलाय का? आला असेल तर फॉरवर्ड करू नका, हळहळ, राग, सहानुभूती काही व्यक्त करू नका.. आपलं काहीही मत बनवण्याआधी ही बातमी पूर्ण वाचा.

Urfi Javed : उर्फी जावेद ला अटक? मुंबई पोलीसांनी उघडं पाडलं नाटक
X

उर्फी जावेद च्या Viral Video मध्ये तिने नेहमीप्रमाणे एक तोकडा लाल रंगाचा टॉप परिधान केलेला दिसतोय. दोन कॉन्स्टेबल तिला हाताला पकडून ऑफिस ला यायला सांगतायत. एक मिनिट.. ऑफिस ? पोलीस कधीच ऑफिस ला बोलवत नाहीत, पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतलं असेल किंवा अटक केली असेल तर पोलीस ठाण्याला घेऊन जातात, ऑफिसला नाही. त्यात महिला पोलिसांचे कपडे थोडे गबाळे दिसत असले तरी पायात स्पोर्टस् शूज घातलेले आहेत. त्यामुळे या व्हिडीयोच्या सत्यतेबाबत चाणाक्ष नेटकऱ्यांना संशय येणे स्वाभाविकच होतं. उर्फीला अटक झाल्याची बातमी नेटवर पसरली. मात्र या व्हायरल व्हिडीयोनंतर मुंबई पोलीसांनी हे संपूर्ण नाटक असल्याचं जाहीर केलं. इतकंच नव्हे तर सोशल मिडीयावर हे नाटक उघडं पाडलं

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुणीही कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही असं म्हणत मुंबई पोलिसांनी या व्हिडीयोत वापरण्यात आलेली स्कॉर्पीओ गाडी जप्त केलीय, त्याच प्रमाणे व्हिडीयोतील तोतया पोलीसांवर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस - Mumbai Police

@MumbaiPolice

स्वस्त प्रसिद्धीसाठी, कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही! मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा एक व्हायरल व्हिडिओ खरा नाही-सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे. तथापि, दिशाभूल करणार्‍या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरूद्ध, ओशिवरा पोलिस ठाणे येथे कलम १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असताना, तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि वाहनही जप्त करण्यात आले आहे. #RealityCheck

दरम्यान, नेहमी कमी कपडे घालणाऱ्या उर्फी जावेद ने पूर्ण कपडे घातल्यामुळे तिला अटक झाली आहे अशा आशयाचे मीम्स ही सध्या व्हायरल आहेत. तुमच्याकडे असे मीम्स फॉरवर्ड होत होत आले असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. एकदा मुंबई पोलीसांचा रिॲलिटी चेक करणारं निवेदन जरूर वाचा.


Updated : 4 Nov 2023 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top