Home > Entertainment > देशात पहिल्यांदाच ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'हा' चिञपट

देशात पहिल्यांदाच ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार 'हा' चिञपट

देशात पहिल्यांदाच ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार हा चिञपट
X

देशभराता वेगवेळ्या राज्यात चित्रपटांची वेगळी शैली आहे. देशातील विविध राज्यातील भाषेनुसार हे चित्रपट प्रदर्शित होत असतात. परंतू देशात पहिल्यांदाच एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे हा चित्रपट तब्बल ३८ भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘कुंगवा’ असे ह्या चिञपठाचे नाव आहे.

साउथचा सुपरस्टार सुर्या या चिञपठात दिसणार आहे. सुर्या हा त्याच्या वेगळ्या स्टाईल साठी जाणला जातो. सुपरस्टार सुर्या याने त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं कंगुवामधील लूक शेयर केला होता. तेव्हापासून या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत. सुर्याचा हा ‘कुंगवा’ चिञपठ तब्बल ३८ भाषांमधे प्रदर्शित होणार आहे असे कळले आहे. या चिञपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. या अगोदर सुर्याने जय भिम, चोवीस, गजनी, सिंगम, मास असे अनेक चिञपट सुपर हिट दिले आहेत . सुपरस्टार सुर्या याचा प्रेक्षक वर्ग खुप मोठा आहे. ‘कुंगवा’ हा चिञपट पुढील वर्षी २०२४ मध्ये रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चिञपटात दिशा पठानी, बॉबी देवल, जगापती बाबू असे लोकप्रिय कलाकार दिसणार आहे.Updated : 22 Nov 2023 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top