Home > Entertainment > 67th National Film Awards: सुपरस्टार रजनीकांत यांचा 'दादासाहेब फाळके पुरस्कारा' ने सन्मान

67th National Film Awards: सुपरस्टार रजनीकांत यांचा 'दादासाहेब फाळके पुरस्कारा' ने सन्मान

67th National Film Awards: सुपरस्टार रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारा ने सन्मान
X

सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकट्या नायडू यांनी रजनीकांत यांना या पुरस्काराने दिल्लीत सन्मानित केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी रजनीकांत यांचं नाव एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आलं होतं.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनीकांत यांनी माझ्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. मला लोकांचे प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जात आहे.

रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून केली होती. कन्नड नाटकांमध्ये नाहीच तर तामिळ सिनेमा आणि बॉलिवूडला ही आपल्या अभिनयाची भुरळ पाडली. आत्तापर्यंत त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

रजनीकांत यांनी आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत देशभरातच नाही तर जगभरात आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

सिनेसृष्टीत महत्त्वाची कामगिरीबद्दल बजावल्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांचा गौरव करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

Updated : 25 Oct 2021 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top