Home > Entertainment > South Actors | साऊथच्या अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

South Actors | साऊथच्या अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

South Actors | साऊथच्या अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क
X

देशभरात एकुण सात टप्प्यात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्याला आजपासून सुरुवात झाली. लोकसभा निवडणूकीच्या या पहिल्या टप्प्यात देशातल्या २१ राज्यातील एकुण १०२ जागांसाठी मतदान पार पडत आहे. तामिळनाडूमध्ये सुरू झालेल्या मतदानाला सुपरस्टार अभिनेते रजनीकांता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. शुक्रवारी रजनीकांत सकाळी चेन्नईच्या स्टेला मॅरीस कॉलेजमध्ये मतदान करताना दिसले. त्यांच्यासह सुप्रसिध्द अभिनेता कमल हसनही मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले होते.

याशिवाय धनुष्यही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानकेंद्रावर पोहोतल्याचे दिसले. धनुषचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. परंतु पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे मतदानकेंद्रात नेले. आणि त्यांने आपले मत केले. याबरोबरच विजय सेतुपती याने सुध्दा किलपॉक येथील चेन्नई हायस्कूलमध्ये मतदानकेंद्रावर जाऊन आपले मत केले. साऊथचे सुपस्टार अजित कुमारही मतदानासाठी आला होता. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या मतदानात या दिग्गज अभिनेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Updated : 19 April 2024 1:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top