Home > Entertainment > सानिया मिर्झापासून विभक्त, शोएब मलिकने सना जावेदशी केले लग्न

सानिया मिर्झापासून विभक्त, शोएब मलिकने सना जावेदशी केले लग्न

सानिया मिर्झापासून विभक्त, शोएब मलिकने सना जावेदशी केले लग्न
X

पाकिस्तान क्रिकेट स्टार शोएब मलिकने ( Shoaib Malik ) भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झासोबत (Sania Mirza ) विभक्त झाल्याच्या अफवांदरम्यान लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed ) यांच्याशी लग्न केलं आहे . शोएब मलिक यांनी शनिवारी, 20 जानेवारी रोजी सना जावेदसोबत लग्न समारंभातील फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहे. शोएब मलिक आणि सना जावेद यांचा विवाह 18 जानेवारीला कराचीत येथे पार पडला.

शोएबने दुसऱ्या पत्नीसोबत लग्नाच्या ड्रेसमध्ये केले फोटो शेअर

क्रिकेटर शोएब मलिकने शनिवारी आपल्या निकाह फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोंमध्ये शोएबची तिसरी पत्नी सना जावेदसोबत हस्तिदंती रंगाच्या पारंपारिक वेडिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या हातावर मेहंदी दिसत आहे आणि सनानेही वधूचे वजनदार दागिने घातले आहेत. आपल्या निकाह सोहळ्याचे फोटो शेअर करताना शोएबने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अल्हमदुलिल्लाह. असं लिहीलं आहे

सना जावेदने लग्नानंतर इन्स्टा बायोवर तिचे नाव बदलले

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदनेही शोएब मलिकसोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एवढेच नाही तर अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा बायोमध्ये तिचे नाव बदलून सनाचा उल्लेख शोएब मलिक असा केला आहे.
Updated : 20 Jan 2024 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top