Home > Entertainment > ‘Animal’ चित्रपटातील 'ती' गन ५०० कीलो वजनाची

‘Animal’ चित्रपटातील 'ती' गन ५०० कीलो वजनाची

‘Animal’ चित्रपटातील ती गन ५०० कीलो वजनाची
X

सद्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो म्हणजे 'Animal ' चित्रपट. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या ॲनिमल चित्रपटाचा टिझरपाहुन चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. या चित्रपटाचे भरमसाट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताय.अशातच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी मारली आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर याच्यासोबत रश्मीका मंदाना (rashmika mandanna) ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसत आहे. ॲनिमल चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये प्रेक्षकांचा मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘अ‍ॅनिमल’ने ७ कोटींची जबरदस्त कमाई केल्याचंही स्पष्ट झालं आहे. रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ हा फार हिंस्त्र चित्रपट असल्याचं संदीप रेड्डी वांगा यांनी स्पष्ट केलेलं.

ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणबीर कपूर एक भली मोठी गन चालवताना दिसला आहे. ती गन व्हीएफएक्सच्या माध्यमातून बनवली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. परंतु ती गन खरी बनवण्यात आली असल्याचा खुलासा नुकताच चेन्नईमधील पत्रकार परिषदेत चित्रपटाचे प्रोडक्शन डिजायनर सुरेश सेलवाराजन यांनी या गोष्टीचा खुलासा केला. ५०० कीलोची पूर्णपणे स्टीलची ही मोठी गन बनवण्यासाठी त्यांना ४ महिने लागले अस त्यांनी सांगितले.

Updated : 30 Nov 2023 1:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top