Home > Entertainment > ‘शार्क टँक इंडिया’ची झाली ‘पोल खोल’

‘शार्क टँक इंडिया’ची झाली ‘पोल खोल’

शार्क टॅंक इंडिया (shark tank india) स्क्रिप्टेड असल्याचे, नाटकी असल्याचे म्हटले गेले होते. शार्क अनेकदा मुद्दाम चांगल्या उद्योजकांनाही गुंतवणूक नाकारतात, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. राहुल दुआने (rahul dua) मजेत का होईना पण खरे काय ते सांगून टाकले, असताना पोल खोल झाली असून नटीझन्स आता राहुल दुवाची तिसऱ्या सिझनमधून पत्ता कट झाल्याचं म्हणत आहेत.

‘शार्क टँक इंडिया’ची झाली ‘पोल खोल’
X

‘शार्क टॅंक इंडिया’ या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वर सुरु असलेल्या लोकप्रिय बिझनेस शोची ‘पोल खोल’ कॉमेडियन राहुल दुआ याने केली आहे. राहुल दुआचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, इतकेही खरे बोलायचे नसते. आता तिसऱ्या सीझनमधून तुझा पत्ता कट… असेही अनेकांनी म्हटले आहे.

यासंदर्भातला कपिलच्या शोमधला राहुल दुआचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राहुल शार्कबद्दल बोलत असताना तो म्हणतो की, ‘यांना जर गुंतवणूक करायची असेल तर, ते कशीही करतात. आम्हाला बिझनेस समजला नाही, पण आम्हाला तू आवडला. पण एखादा फायद्यात सुरू असलेला बिझनेस असेल आणि तरीही यांना त्यांना जर गुंतवणूक द्यायचीच नसेल तर, त्याची चार कारणेही तयार असतात. एखादा बिझनेस बी टू बी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कस्टमर दोन्हीमध्ये असेल तर हे बोलतात तुमचा फोकस नाहीये. आणि फक्त बी टू बी असेल तर म्हणतात तुम्हाला व्हिजन नाहीये. जर एखादी कंपनी लोकल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बिझनेस करत असेल तर, त्यालाही म्हणतात, काय करताय हे… आणि नसेल करत तरीही ते हेच बोलतात… का करत नाही.

Updated : 13 Feb 2023 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top