Home > Entertainment > Shahrukh Khan : शाहरुख ' खान ' संस्कारांची.

Shahrukh Khan : शाहरुख ' खान ' संस्कारांची.

संस्कार कसे असावे याचे उदाहरण म्हणून पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खान याची एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अशा या व्हिडिओमध्ये शाहरुख खान हा प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale)यांची सेवा करताना दिसतोय.

Shahrukh Khan :  शाहरुख  खान  संस्कारांची.
X


संस्कार कसे असावे याचे उदाहरण म्हणून पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खान याची एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अशा या व्हिडिओमध्ये शाहरुख खान हा प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale)यांची सेवा करताना दिसतोय.

निमित्त होतं भारत (INDIA) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील वर्ल्डकप (World Cup 2023 )ची अंतिम लढत. वर्ल्ड कपच्या या अंतिम लढतीसाठी अनेक कलाकार हे गुजरात (Gujarat) येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर (Narendra Modi Stadium) उपस्थित होते. सामना चालू असताना गायिका आशा भोसले या स्टेडियम मध्ये मॅच पाहण्यासाठी आल्या. शाहरुख ही आधीपासूनच तेथे उपस्थित होता. आशाताई आल्यानंतर शाहरुख खान हे त्यांच्या शेजारी जाऊन बसले व मॅच पाहू लागले. यादरम्यान आशा भोसले ह्या कॉफी पीत असाव्यात.

यानंतर वयस्कर आशा भोसले यांना संबंधित कप ठेवण्यासाठी उठाव लागू नये याकरिता. शाहरुख खान स्वतः उठले आणि त्यांनी स्वतःहून त्यांच्या जवळील तो कप घेतला व एका कर्मचाऱ्याला नेऊन दिला. हे सगळं घडत असताना अशा भोसले यांची शाहरुखने घेतलेली काळजी. त्यांची केलेली विचारपूस आणि क्षण मात्रात घडलेली सेवा हे शाहरुख खान यांचे संस्कार दर्शवणारे आहे. अशा आशयाने संबंधित घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Updated : 20 Nov 2023 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top