Home > Entertainment > SEBI कडून अभिनेता आर्शद वारसीला शेअर मार्केटमध्ये येण्यास मज्जाव...

SEBI कडून अभिनेता आर्शद वारसीला शेअर मार्केटमध्ये येण्यास मज्जाव...

शेअर मार्केटबाबत सोशल मिडीयावरुन गैरसमज पसरवल्याच्या आरोपावरुन आर्शद वारसी आणि त्यांची पत्नी मारिया गारोटी यांना शेअर मार्केटमध्ये बिझनेस करण्यास सेबीने बंदी घातली आहे. सेबीने याची दखल घेत ही कडक कारवाई केली आहे.

SEBI कडून अभिनेता आर्शद वारसीला शेअर मार्केटमध्ये येण्यास मज्जाव...
X

सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर्स खरेदी करण्याची सूचना भ्रामक व्हिडिओद्वारे समाजमाध्यमांमध्ये पसरवण्याच्या कारणावरुन SEBI ने अभिनेता आर्शद वारसी आणि त्यांची पत्नी मारिया गारोटी यांच्यावर कडक कारवाई केली आहे. तसेच शेअर्समध्ये हेराफेरीसंदर्भात सुद्धी ही कारवाई करत आल्याचे सेबीने सांगितले आहे. दोघां पती-पत्नींना शेअर बाजारात बिझनेस करण्यास म्हणजेच गुंतवणूक आणि ट्रेडींग करण्यास बंधने घालण्यात आली आहे. आर्शदने शार्पलाईन आणि साधनांच्या शेअर्समध्ये पंप अँण्ड डंप एक्टिविटीचा शोध घेतला. त्यामध्ये, यूट्यूब (YOU TUBE ) वर लहान गुंतवणूकदारांना गोंधळात टाकणारे प्रोमोशनल व्हिडिओ बनवून पंर अँण्ड डंप केले जात होते. याद्वारे गुंतवणूकदारांना ५० कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणाची SEBI कडे वारंवार तक्रार येत होत्या. त्याची सेबीने दखल घेत ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

साधना ब्रॉडकास्टच्या स्टॉक्सच्या किंमतीत हेराफेरी होत आहे. जे युनिट्स हे काम करत आहेत, ते शेअर्संना काढून टाकत आहे. याप्रकरणी तपास करताना सेबीने गुरुवारी अभिनेता आर्शद वारसी ( ARSHAD WARSI ), आणि त्याची पत्नी मारिया, साधना ब्रॉडकास्टचे प्रमोटर्स यांच्यासमवेत ४४ यूनिट्सना सेक्युरिटी मार्केटमध्ये व्यापार करण्यास निर्बंध घातले आहेत. समाजमाध्यमामध्ये यूट्यूब व्हिडिओ ( YOU TUBE VIDEO ) च्या माध्यमातून इन्वेस्टर्संना लालच दाखवण्यात येत आहे, याबाबत सेबीकडे तक्रार आली होती. SEBI ने गेल्यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान याप्रकरणाचा तपास सुरु केला. यामध्ये, व्हिडियो शेअर केल्यानंतर साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्संमध्ये तेजी पाहायला मिळाली होती, त्यातून प्रमोटर्सने भरपूर पैसे कमावले, असल्याचा ठपका SEBI ने ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

Updated : 3 March 2023 7:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top