Home > Entertainment > सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गुढ...पोलिस तपास सुरु...

सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गुढ...पोलिस तपास सुरु...

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन नेमके कशामुळे झाले यांचा पोलिस सध्या तपास करत आहेत. ते फॉर्महाऊसवर कधी पोहचले, होळीच्या पार्टीत नेमके काय घडले? कौशिक यांनी हॉस्पिटलला नेईपर्यंत कुठलीही माहिती पोलिसांना का देण्यात आली नाही? हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांना याबाबत महिती दिली. त्यामुळे सतिश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे गुढ...पोलिस तपास सुरु...
X

आज सकाळी फिल्म इंडस्ट्रीला एक मोठा धक्का बसला. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा सकाळी मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे जीवलग मित्र आणि अभिनेते अनुपम खेर ( Anupam Kher) यांनी आपल्या ट्विटर पेजवरुन दिली. सतीश कौशिक यांनी मृत्यूच्या एकदिवस अगोदर होळीची पार्टी केली होती. आणि त्या रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यानंतर त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. मात्र हे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले आणि त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. दिल्ली पोलीस आता कौशिक यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेत आहेत.

सतीश कौशिक (Satish Kaushik) यांची तब्येत ज्या फार्महाऊसवर बिघडली तिथे ते कधी पोहचले आणि त्या ठिकाणी काय झाले? याचा दिल्ली पोलीस तपास करत आहेत. तसेच कौशिक यांची तब्येत बिघडल्यानंतर ज्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलला नेले त्या सर्वांची दिल्ली पोलिस आता चौकशी करणार आहेत. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी मुंबईतील अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या घरी आयोजित केलेल्या होळीच्या पार्टीत सहभागी झाले होते. तिथे त्यांना शबाना आझमी आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यासह निकटवर्तींयांसोबत होळीचा आनंद लुटला होता. त्याचे फोटो सुद्धा ट्विट करण्यात आले होते.

मुंबईत शबाना आझमी यांच्या घरी ७ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या होळीच्या पार्टीत सतिश कौशिक सहभागी झाल्यानंतर ते ८ मार्चला दिल्लीतील त्यांच्या कुटुंबासह होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला फार्महाऊस होळी खेळायला गेले होते. तिथे रात्री ११ वाजता कौशिक यांची तब्येत ढासळली. त्यानंतर तातडीने त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी फॉर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) उपचारासाठी दाखल केले. फॉर्टीस रुग्णालयातील डॉक्टरांनी सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा जीव वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला मात्र डॉक्टरांच्या पदरी निराशा आली आणि अखेर उशीरा रात्री कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला.

तर दुसरीकडे सतिश कौशिक (Satish Kaushik) यांना रुग्णालयात नेईपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नव्हती. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर हॉस्पिटल ( Hospital) प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे दिल्ली पोलिस ( Delhi Police) कौशिक यांच्या मृत्यूचा सर्व अँगलने तपास करत आहे. सुरवातीच्या तपासात पोलिसांना अद्यापपर्यंत काहीही संशयास्पद सापडले नसल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. दिल्लीच्या हरिनगर दीनदयाल रुग्णालयाच्या मेडिकल तज्ज्ञांकडून सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्यावर पोस्टमोर्टम करण्यात आले असून, त्याचे डेथ टाईम, कौशिक यांनी रात्री काय खाल्ले होते किंवा काय प्यायले होते. याचा रितसर रिपोर्ट पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. पोलिस आता तपास करुन आपला रिपोर्ट वरिष्ठांना सादर करणार आहेत. त्यानंतरच सतिश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकणार आहे. दरम्यान, सतिश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानं बॉलिवूड (Bollywood) कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी शशि कौशिक आणि ११ वर्षीय मुलगी असा परिवार आहे.

Updated : 9 March 2023 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top