Home > Entertainment > Riteish Deshmukh : 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो' म्हणत रितेश देशमुखचं दिग्दर्शनात पाऊल

Riteish Deshmukh : 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो' म्हणत रितेश देशमुखचं दिग्दर्शनात पाऊल

Riteish Deshmukh  : वेडेपणा करायला मुहूर्त नसतो म्हणत रितेश देशमुखचं दिग्दर्शनात पाऊल
X

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh ) आणि त्याची पत्नी जेनेलिया रितेश देशमुख(Genelia Riteish Deshmukh) यांच्या प्रमुख भुमिका असलेला मराठी चित्रपट वेड(Ved) लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे रितेशनं पहिल्यांदाच या सिनेमासह दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.

दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत (Nishikant Kamat) याच्या लय भारी (Lai Bhari) चित्रपटातून रितेश देशमुखनं मराठी चित्रपटात पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्याने आदित्य सरपोतदार दिग्दर्शित माऊली(Mauli) चित्रपटातून दुहेरी भुमिका साकारली. हे दोन्ही चित्रपट तुफान यशस्वी झाल्यानंतर रितेश त्याचा तिसरा मराठी चित्रपट घेऊन येतोय ते म्हणजे वेड(Ved). तशी घोषणाच त्याने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्स वरून केली आहे. एका रिल व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही "वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाली पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारीख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं वेड तुमच्यापर्यंत..." असं म्हणत या चित्रपटाची घोषणा केली आहे.

या सोबत रितेशने सिनेमाचं एक पोस्टर देखील त्याच्या चाहत्यांसमोर प्रदर्शित केलं आहे. ज्यात रितेश देशमुखचा डॅशिंग सोबत हातात सिगारेट असलेला लुक पाहायला मिळतोय. त्याच्याच मागे आपल्याला जेनेलिया देशमुखचा देखील पहिला लुक आपल्याला पाहायला मिळतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करत असून या चित्रपटाला अजय अतूल (Ajay Atul) यांचं संगीत असणार आहे.

Updated : 27 Oct 2022 8:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top