Home > Entertainment > माझ्या फोटोंसोबत छेडछाड केली गेली – रणवीर सिंह

माझ्या फोटोंसोबत छेडछाड केली गेली – रणवीर सिंह

माझ्या फोटोंसोबत छेडछाड केली गेली – रणवीर सिंह
X

बॉलिवुडचा सिंबा अशी ओळख असलेला रणवीर सिंह हा कायम त्याच्या जगावेगल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतो. अनेक निरनिराळे, चट्टेरी पट्टेरी कपडे घालुन तो आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतो. तो स्वतःच स्वतःचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मिडीया हँडलवरून अपलोड करत असतो आणि बऱ्याचदा तो यामुळे ट्रोल देखील होतो. सव्वा महिन्याभरापुर्वी रणवीर ने असेच त्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आणि तो ट्रोल नाही झाला तर गदारोळ माजला. कारण ते न्युड फोटो होते. यावरून त्याला शिव्या घातल्या गेल्या त्याच्याविरूध्द पोलिसात तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि आता महिना लोटल्यानंतर रणवीर ने त्याच्या फोटोंसोबत छेडछाड केली गेली असल्याचा जबाब मुंबई पोलिसांकडे नोंदवला आहे. नेमकं प्रकरण काय आहे जरा तपशिलवार पाहुयात.

२२ जुलैला रणवीर सिंह ने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून त्याचे न्युड फोटो शेअर केले होते. आता रणवीर काही पहिला नट नव्हता ज्याने न्युड फोटो शुट केलं होतं. त्याच्या आधी मिलिंद सोमण याचं नव्वदीच्या दशकातलं मधु सप्रे सोबतचं न्युड फोटोशुट प्रचंड वादात राहिलं होतं. त्यानंतर काही वर्षांपुर्वी मिलिंद सोमण हा गोव्याच्या बीचवर नग्नावस्थेत धावला होता. हं तर रणवीर काही पहिला अभिनेता नव्हता. पण तरी त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्याच्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मुंबईतील चेंबुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. इतकंच नाही त्या तक्रारीवर आधारीत कलम ६७ अ, कलम २९२, २९३, ३५४ आणि ५०९ नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. भारत हा संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला 'नायक' असे म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकाराला फॉलो करत असतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये असं मत त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने म्हटलं होतं.

या सगळ्य़ा प्रकाराला जवळपास महिना उलटल्यावर २९ ऑगस्टला मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहचा जबाब नोंदवला. त्याचं म्हणणं आहे की मी जे फोटो शुट केलं ते अश्लिल नव्हतं. त्यात मी अंतर्वस्त्र घातली होती. शिवाय त्याच्या काही फोटोंसोबत छेडछाड केली गेली असल्याचं तो म्हणाला आहे. शिवाय छेडछाड झाली की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी ते फोटो फॉरेंसिक लॅब मध्ये पाठवल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रणवीर त्याने फोटो अपलोड केल्य़ाचंही म्हणतोय आणि ते अश्लिल नसल्याचंही म्हणतोय. पण तो हेही सांगतोय की त्याच्या फोटोसोबत छेडछाड केली गेली असल्याचंही सांगतोय. रणवीरला नेमकं काय होतंय हे तोच जाणे. आता खरंच त्याच्या फोटोंसोबत छेडछाड झाली आहे की नाही हे येणारा काळच सांगेल.

Updated : 15 Sep 2022 2:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top