Home > Entertainment > ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रणबीर कपूर याच्या ॲनिमल चित्रपटाने मारली बाजी

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रणबीर कपूर याच्या ॲनिमल चित्रपटाने मारली बाजी

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रणबीर कपूर याच्या ॲनिमल चित्रपटाने मारली बाजी
X

रणबीर कपूर याच्या ॲनिमल चित्रपटाचा टिझरपाहुन चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळालीयं. या चित्रपटाचे भरमसाट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी मारली आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसत आहे.ॲनिमल चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये प्रेक्षकांचा मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘अ‍ॅनिमल’ने ३.४ कोटींची जबरदस्त कमाई केल्याचंही स्पष्ट झालं आहे.

रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ हा फार हिंस्त्र चित्रपट असल्याचं संदीप रेड्डी वांगा यांनी स्पष्ट केलेलं. याला सेन्सॉरकडून ए सर्टिफिकेट मिळालं असून याची लांबी ३ तास २१ मिनिटे आहे. भारतात पहिल्यांदाच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चिञपटाने एवढी कमाई केली आहे. रणबीरच्या या चिञपठाचे चाहते आतुरतेने वाट पाहतायत.आता पुढील काही दिवसांमधे हा चिञपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल. हा चिञपट लवकरच तुमच्या जवळच्या चिञपट गृहात दिसेल.
Updated : 26 Nov 2023 10:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top