Home > Entertainment > Preeti Zinta नं ड्रिम ड्रेस बार्बीमध्ये केलं फोटोशूट

Preeti Zinta नं ड्रिम ड्रेस बार्बीमध्ये केलं फोटोशूट

Preeti Zinta नं ड्रिम ड्रेस बार्बीमध्ये केलं फोटोशूट
X

अभिनेत्री प्रीती झिंटानं (Preeti zinta) नुकतंच एक फोटोशूट केलंय. त्या फोटोशूटचा एक व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

सोमवारी रात्री इंस्टाग्रामवर प्रितीने एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. ज्यामध्ये तिने कॅमेऱ्यासाठी वेगवेगळ्या पोझ आणि एक्सप्रेशन्स (Expressions) दिले आहेत. व्हिडिओची सुरुवात प्रीती गुलाबी थीम रूममध्ये बेडवर बसलेली आहे. त्यात भिंती, चादरी, टेबल लॅम्प, रग्ज, फोन, पडदे यापासून सर्वकाही गुलाबी रंगात आहे. हसत हसत आणि कॅमेरासमोर पोज देताना तिच्या हातात गुलाबी रंगाचा फोन आहे. क्लिपमध्ये तिने उडीही मारलीय आणि ती बेडवर पडल्याचं दाखवण्यात आलंय.

प्रितीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यात फ्रिल आणि सिल्व्हर हील्स होती. या व्हिडिओंमध्ये बॅकग्राऊंडला एक्वाचं बार्बी गर्ल हे गाणं वाजत आहे. या निमित्तानं मी माझ्यातील बार्बी बाहेर काढत हे मजेदार शूट केल्याचं प्रीतीनं सांगितलं. तर या वीकेंडला #Barbie चित्रपट पाहिल्यानंतर ही पोस्ट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नसल्याचं तिनं सांगितलं. दरम्यान, चित्रपटगृहात सगळीकडे पिंक रंग दिसत होता.

दरम्यान, प्रीतीच्या या व्हिडिओ वर एका चाहत्याने लिहिले, "आता आम्हाला तुमची भूमिका करणारी भारतीय बार्बी हवी आहे आणि @hrithikroshan केन असू शकतो." एका व्यक्तीने कमेंट केली, "तू केटी पेरीसारखी दिसतेस." "चला बार्बीचे बॉलीवूड व्हर्जन बघूया" अशा मजेदार कमेंट्सचा पाऊसच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पडलाय.


Updated : 1 Aug 2023 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top