Home > Entertainment > चाहत्याला चापट मारण्याप्रकरणी नाना पाटेकर म्हणाले, मला....

चाहत्याला चापट मारण्याप्रकरणी नाना पाटेकर म्हणाले, मला....

चाहत्याला चापट मारण्याप्रकरणी नाना पाटेकर म्हणाले, मला....
X

अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयामुळे नाना पाटेकरांचा चाहता वर्ग हा संपूर्ण देशभर आहे. प्रत्येक वेळी अँग्री यंग मॅन चा अभिनय करणारे नाना प्रत्येक्षात त्या कॅरेक्टमध्ये दिसले. हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरलं होत असल्याने अनेक जण यावर प्रकारामुळे अभिनेते नाना पाटेकरांना ट्रोल करत आहेत. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नाना पाटेकर यांनी मागीतली फॅन ची माफी

व्हायरलं व्हिडीओवर बोलताना अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की " आमचा शुटींगचा एक भाग होता ज्यामध्ये मागून एक मुलगा मला बोलत होता की 'ये बुडोव टोपी बेचनी है' क्या ? असं विचारतो आणि त्याला मी पकडतो चापट मारतो हा सिनेमाचा सिन होता. प्रत्यक्षात तो मुलगा कोण होता हे माहीत नाही. हा सिन होत असताना त्याच्या मित्राने हा व्हिडीओ शुट केला असेल, सिनेमाच्या सिन नुसार त्याला चापट लगावली, नंतर समजलं की हा आपला शुट मधील मुलगा नाही. मला माहित नव्हत की तो फॅन आहे ते, मी कोणत्याचं चाहत्यांसोबत असं करत नाही. हजारो जण माझ्यासोबत फोटो काढत असतात. खूप गर्दी होती त्या ठिकाणी, त्यांमुळे माझ्याकडून चुकून झालं. मला माहिती देखील नव्हती तो कुढून आला. कोणाला माझ्या संदर्भात गैरसमज झाला असेल तर मला माफ करा असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केल

काय होत प्रकरण

नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नाना पाटेकर यांनी वाराणसीमध्ये शूटिंगदरम्यान रागाच्या भरात एका चाहात्याच्या डोक्यावर मारल्याचं या व्हिडीओत दिसून आला होता. या व्हिडिओनंतर नाना पाटेकर यांना खूप ट्रोल केले जात होतं. अशा परिस्थितीत, आझाद अधिकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ ठाकूर (Amitab Thakur) यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात वाराणसीमध्ये १४ नोव्हेंबर २०२३ रोजी एका चाहत्याला थप्पड मारून आणि क्रूरपणे गळा दाबल्याप्रकरणी तक्रार दाखल करत एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी केली आहे.


Updated : 16 Nov 2023 5:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top