Home > Entertainment > पत्रकार उमेश कुमावत यांचे नवीन युट्यूब चॅनेल

पत्रकार उमेश कुमावत यांचे नवीन युट्यूब चॅनेल

पत्रकारितेच्या मंचावर दिसणारे पत्रकार उमेश कुमावत बनले रॅपर

पत्रकार उमेश कुमावत यांचे नवीन युट्यूब चॅनेल
X

ज्येष्ठ पत्रकार उमेश कुमावत यांनी आता एका नव्या पर्वाचे सुरुवात करत, नवीन यूट्यूब चॅनल सुरू केले आहे.

पूर्व ABP NEWS न्यूज सिनिअर एडिटर आणि TV ९ मराठी या वृत वाहिनीवर सध्या कार्यरत असलेले उमेश कुमावत यांनी आता रॅपकडे वळण्याचा निर्णय घेत एक नवीन यूट्यूब चैनल सुरू केले आहे

(UMESH KUMAWAT) उमेश कुमावत नावाने पत्रकार कुमावत यांनी हे चॅनल सुरू केलेले आहे.
आपण बरेचसे पत्रकार मुख्य धारेतली पत्रकारिता सोडून यूट्यूब कडे वळाल्याचे पहिले आहे मात्र,

उमेश कुमावत यांनी हे यूट्यूब चॅनल पत्राकरीतेसाठी सुरू केलेले नसून रॅप सॉन्ग साठी सुरू केलेले असल्याच स्वतः उमेश कुमावत यांनी सांगितले आहे

येत्या 11 तारखेला त्यांचे पहिले रॅप (RAP SONG)चॅनेलवर प्रसारित होणार आहे, याची माहिती स्वतः उमेश कुमावत यांनी त्यांच्या नवीन चॅनल वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिली

रॅप आणि हिप-हॉप (Hip- Hop) यांच्यावर एक्सपिरिमेंट करत आम्ही एक नवीन पिढीला साजेस रॅप सॉंग बनवले आहे. तुम्हाला 11 तारखेला चॅनेलवर पाहायला मिळेल असं म्हणत पत्रकार उमेश कुमावत यांनी लोकांना रॅप सॉंग पाहण्याचे आवाहन केले आहे

हे गाणे (Rap Song) स्वतः उमेश कुमावत यांनी लिहिलेले आहे. उमेश कुमावत यांनीच गायलेले आहे. त्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये उमेश कुमावत त्यांनीच एक्टिंग केलेली आहे.Updated : 12 Feb 2024 5:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top