Home > Entertainment > १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न : अमृता फडणवीस

१ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न : अमृता फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात तक्रार दाखल केली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

१ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न :  अमृता फडणवीस
X

मुंबईस्थित (Mumbai) डिझायरने अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना विशिष्ट माहिती देण्यासाठी आणि तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिली. अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी रोजी मलबार हिल या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. कलम 120, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988, कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला माहिती दिली आहे की आरोपींना अजुनही अटक करण्यात आलेले नाही.

अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही डिझायनर १६ महिन्यांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. 27 जानेवारी 2023 रोजी पुण्यात (pune) एका कार्यक्रमात अनिक्षाला (Aniksha) भेटली. कार्यक्रम संपल्यानंतर अनिक्षाला गाडीत बसवण्यास सांगितले. तेव्हा अनिक्षाने अमृता फडणवीस अशी ऑफर दिली की आपण बुकींकडून पैसे कमावू शकतो. एकतर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती त्यांना देऊन वा त्यांच्याकडून कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून आपण पैसे कमावू शकतो," अशी माहिती अमृता फडणवीसांनी तक्रारीत दिली आहे.

अनिक्षाची ऑफर ऐकून अमृता फडणवीस यांनी गाडी थांबवली आणि अनिशाला खाली उतरण्यास सांगितले. खाली उतरल्यानंतर ती दुसऱ्या गाडीत बसुन अमृता फडणवीस यांचा पाठलाग करत कॅाल करु लागली. परंतु ते कॅाल्सकडे दुर्लक्ष करु लागले. 16 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजता अनिक्षाने आम्हाला फोन करून सांगितले की, तिच्या वडिलांचे नाव गुन्ह्यात सामील आहे. अनिक्षाने कॅालवर सांगितले की यातुन जर तुम्हा आम्हाला बाहेर काढलात तर आम्ही तुम्हाला 1 कोटी रुपये देऊ अशी ऑफर अनिक्षा दिली. हे ऐकताच मी फोन कट केला आणि तीचा नंबर ब्लॅाक केला. असे अमृता फडणवीसांनी सांगितले.

18 फेब्रुवारी रोजी रात्री 11:55 ते 12:15 च्या मध्यरात्री मला 22 व्हिडिओ क्लिप, तीन ऑडिओ संदेश आणि अनेक मेसेज व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात क्रमांकावरून पाठवण्यात आले होते. माझ्या स्टाफ सदस्यालाही त्याच नंबरवरून हे संदेश पाठवण्यात आले होते. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता याच क्रमांकावरून 40 मेसेज, व्हिडिओ, ऑडिओ मेसेज आणि स्क्रीन शॉट्स आले. मला समजले की हा मोबाईल नंबर अनिक्षाचा आहे,” असे अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Updated : 16 March 2023 10:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top