Home > Entertainment > अजय देवगणला शस्त्र बाळगल्याप्रकरणी झाली होती अटक, या अभिनेत्याने केला प्रसंग शेअर

अजय देवगणला शस्त्र बाळगल्याप्रकरणी झाली होती अटक, या अभिनेत्याने केला प्रसंग शेअर

अजय देवगणला शस्त्र बाळगल्याप्रकरणी झाली होती अटक, या अभिनेत्याने केला प्रसंग शेअर
X

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजय देवगणशी संबंधित एक प्रसंग शेअर करत अभिनेता विंदू दारा सिंग यांने माहिती दिली आहे. विंदूने सांगितले की, त्याला आणि अजयसह अनेक मित्रांना एकदा होळीच्या पार्टीदरम्यान पोलीसांनी गुंड समजून अटक केली होती.

कसा घडला होता नेमका प्रसंग?

विंदूने फेमस youtuber सिध्दार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत विंदूने होळीचा एक प्रसंग शेअर केला. विंदू म्हणाला, 'माझ्या कॉलेजच्या दिवसांत एका होळीला, मी अजय आणि आमच्या काही मित्रांनी एकत्र बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता. आम्ही सगळे वांद्रे आणि कार्टर रोडवर जीपमध्ये फिरत होतो. बराच वेळ इकडे तिकडे फिरून एका ठिकाणी आम्ही जीप उभी करून एका दुकानात गेलो. आम्ही परत आलो त्यावेळी पोलीस अधिकारी आमच्या जीपच्या अवती-भोवती उभे असलेलेअसतात. '

तो प्रसंग विषद करताना विंदू म्हणाला की, पोलीसांनी आम्हाला विचारले, ही जीप तुमची आहे का? आम्ही म्हणालो, होय... यानंतर ते ओरडू लागले, त्यांना घेऊन टाका आत. आम्ही विचारले, काय झाले? अॅक्शन सिक्वेन्सचा सराव करणासाठी आमच्या जीपमध्ये तलवारी आणि बंदुका पडून असल्याचे समोर आले, त्यावेळी पोलासांना वाटले की, आम्ही खरोखरच गुंड आहोत.

आमची खरी ओळख पोलीस मानत नव्हते

वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीसांनी आम्हाला लॉकअपमध्ये ठेवले. आम्ही त्यांना सांगून-सागून थकलो की, सर हा वीरू देवगणचा मुलगा अजय देवगण आहे आणि मी दारा सिंगचा मुलगा विंदू दारा सिंग आहे. पण ते हे मानायला तयारच नव्हते. मग कसं तरी एका प्रसिध्द अभिनेत्याला बोलावले आणि त्याने आपण खरेच अभिनेते आहोत हे मान्य करून आम्हला सोडले.

Updated : 10 March 2024 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top