Home > Economy > जागतिक अर्थव्यवस्था पूर्व पदावर येण्यास किती काळ लागेल?

जागतिक अर्थव्यवस्था पूर्व पदावर येण्यास किती काळ लागेल?

जागतिक अर्थव्यवस्था कोरोना पूर्व काळात जशी होती तशी होण्यासाठी किती वेळ लागेल. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण

जागतिक अर्थव्यवस्था पूर्व पदावर येण्यास किती काळ लागेल?
X

जागतिक अर्थव्यवस्था कोरोना पूर्व काळात जशी होती तशी होण्यासाठी किती काळ लागेल ? इकॉनॉमिस्ट नियतकालिक जागतिक अर्थव्यवस्थच्या प्रकृतीत किती वेगाने सुधारणा होत आहे याचा मागोवा ठेवत आहे.

त्यासाठी ७६ प्रमुख देशातील किरकोळ विक्री, प्रवासी व माल वाहतूक अशा क्षेत्रांची आकडेवारी सतत गोळा करत आहे . कोरोना पूर्व काळात जागतिक अर्थव्यवस्था १०० अंकावर असेल असे गृहीत धरले. तर मागच्या एप्रिल २०२० मध्ये ती ३३ अंकांवर घसरली होती. आता जून २०२१ मध्ये ती ६६ अंकांवर पोहोचली आहे. १०० अंकावर पोहोचायला अजून नक्की किती काळ लागेल हे लसीकरणाच्या वेगावर अवलंबून असेल

शरीरात रक्ताभिसरण सतत सुरूच असते; काही कारणांमुळे शरीरात दूषित रक्ताचा प्रादुर्भाव झालाच तर दूषित रक्ताचे प्रमाण कमी करत शुद्ध रक्ताचे प्रमाण वाढवत नेणे हाच उपाय असतो. म्हणजे चला सर्वप्रथम पायातील रक्त शुद्ध करूया, मग हातातील करूया असे करता येत नाही.

गेल्या काही दशकांत जागतिक अर्थव्यवस्था एकजिनसी झाल्यामुळे, कोरोना पश्चात करावयाच्या आर्थिक उपाययोजना सामुदायिक असावयास हव्यात. पण विकसित श्रीमंत देश अप्पलपोटी होत स्वतःचेच घोडे दामटत आहेत; सर्व जगात लवकरात लवकर लसीकरण होण्यासाठी बोलघेवडेपणा शिवाय फार काही करत नाहीत.

जगातील ८०० कोटी लोकसंख्येला लस टोचायची म्हटली तर येणारा खर्च जगाच्या ८० ट्रिलियन्स डॉलर्स जीडीपीच्या एक लक्षांश खर्च येईल. अडाणी लोकांना आपला स्वार्थ परमार्थात आहे हे देखील कळत नाही.

संजीव चांदोरकर (२ जुलै २०२१)

Updated : 3 July 2021 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top