Home > Economy > WEF 2026 | महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स यांच्यात १ लाख कोटी रुपयांचा करार

WEF 2026 | महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स यांच्यात १ लाख कोटी रुपयांचा करार

WEF 2026 | महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स यांच्यात १ लाख कोटी रुपयांचा करार
X


दावोस : जागतिक आर्थिक मंच (WEF) २०२६ च्या व्यासपीठावर महाराष्ट्र सरकारने लोढा डेव्हलपर्स लिमिटेडसोबत IT/ITeS आणि डेटा सेंटर्स क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार (MoU) केला आहे.

या करारामुळे मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) दीड लाख रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोढा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. या एमओयूचा उद्देश मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स विकसित करणे असून, यामुळे राज्याच्या डिजिटल पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “महाराष्ट्र सरकार फक्त एमओयू साइन करत नाही, तर त्यांची अंमलबजावणीही करतो. महाराष्ट्रात दावोसमध्ये झालेल्या एमओयूंची ७५% पेक्षा जास्त अंमलबजावणी झाली आहे, जी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. सोमवारी (दि. १९ जानेवारी) या दिवशी महाराष्ट्राने एकूण १९ एमओयू साइन केले, ज्यात एकूण १४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे आणि १५ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.


Updated : 20 Jan 2026 3:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top