Home > Economy > घरासाठी कर्ज घेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी..! नक्की वाचा

घरासाठी कर्ज घेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी..! नक्की वाचा

घरासाठी कर्ज घेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी..! नक्की वाचा
X

सर्वसामान्य कुटूंबातल्या माणसाला घर घेण्यासाठी संपूर्ण आयुष्याभर कमावलेली संपत्ती खर्च करावी लागते. आणि मग बाकी इतर गोष्टीत त्याची अर्थव्यवस्था बिघडते. त्यामुळे काही लोक घर घेण्यासाठी लोनचा आधार घेतात. ज्यामुळे महिन्याला त्याचा हफ्ता भरत सर्व रक्कम अदा करता येईल. तुम्हीही घर घेण्यासाठी कर्ज घेणार असाल तर संयुक्त गृहकर्ज घेण्याचा प्रयत्न करा. पत्नी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत तुम्ही संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता. याचा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला ते सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळू शकते. दुसरा मोठा फायदा म्हणजे तुम्ही संयुक्त कर्जावर चांगले कर लाभ घेऊ शकता.

7 लाख रुपये वाचवू शकता

संयुक्त गृहकर्ज घेतल्यास दोन्ही कर्जदार आयकर कायद्याच्या कलम 80C आणि कलम 24(b) अंतर्गत आयकर लाभांसाठी क्लेम करू शकतात. कलम 80C अंतर्गत, दोन्ही कर्जदार मूळ रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकतात. कलम 24 अंतर्गत, दोघेही रु. 2 लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजावर कपातीचा दावा करू शकतात. अशाप्रकारे, अर्जदार कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजावर जास्तीत जास्त 3.50 लाख रुपये वजा करू शकतो आणि संयुक्त गृहकर्जाच्या बाबतीत, दोन्ही मिळून जास्तीत जास्त 3.50-3.50 म्हणजे एकूण 7 लाख रुपये वाचवू शकता.

संयुक्त गृहकर्जाचे फायदे

एकाच कर्ज अर्जदाराला त्याच्या उत्पन्नानुसार कर्ज दिले जाते. पण संयुक्त कर्जामध्ये दोघांचे एकूण उत्पन्न गृहीत धरले जाते. अशा परिस्थितीत कर्जाच्या रकमेची मर्यादा वाढते.

जर तुम्ही महिला सह-अर्जदारासोबत संयुक्त गृहकर्ज घेतले तर तुम्हाला थोड्या कमी व्याजदराने कर्ज मिळते. महिला सह-अर्जदारांसाठी वेगवेगळे गृहकर्ज व्याजदर देतात. हा दर साधारणपणे चालू दरापेक्षा सुमारे ०.०५ टक्के कमी असतो. परंतु हा लाभ घेण्यासाठी स्त्री ही संपत्तीची एकमेव किंवा संयुक्त मालक असावी लागते.

Updated : 21 April 2024 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top